ETV Bharat / state

Brahmn name controversy: ब्राम्हणांवर टीका करणाऱ्या भुजबळांवर भाजपाचे प्रवक्ते 'शिवराय' कुलकर्णींचा टोला, म्हणाले... - ब्राह्मण समाजावर वादग्रस्त विधान

नाशिक येथे एक शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी ब्राह्मण समाजावर वादग्रस्त विधान केलं. या विधानामुळे भुजबळ टीकेचे धनी झाले आहेत. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजातील नावांची उदाहरणे देत भुजबळांना चपराक लागवलीय.

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी
author img

By

Published : Aug 20, 2023, 1:59 PM IST

अमरावती : मंत्री छगन भुजबळांवर टीका करताना भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी थेट उदाहरणं दिली आहेत. कुलकर्णी यांनी आपल्या पत्नी आणि मुलांचे नाव सांगत भुजबळांना जोरदार चपराक लगावलीय. ब्राह्मण समाजातील अनेक लोकं आहेत, ज्यांचे नाव शिवाजी आणि संभाजी नाव आहे. अनेकजण मोठं-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. शिवराय कुलकर्णी यांनी उदाहरणासहित भुजबळांवर टीका केल्याने छगन भुजबळ हे आपल्या विधानामुळे तोंडघशी पडलेत.

छगनराव, तुमचे मतभेद असू शकतात. पण नाहक अपप्रचार करू नका. ब्राह्मण समाजातील काही उदाहरणे देतो. माझे नाव शिवराय भास्करराव कुलकर्णी, पत्नीचे सई आणि मुलाचे शंभू. ( ही नावे श्रीशिवछत्रपतींना दैवत मानून ठेवली आहेत.) - शिवराय कुलकर्णी, भाजपा प्रदेश प्रवक्ते

नावाची इतर उदाहरणे : अमरावतीत तपोवन स्थापणारे पहिले कुष्ठरुग्णसेवी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन, ज्येष्ठ संघ प्रचारक दिवगंत शिवरायजी तेलंग, विद्याधरजींचे पिता संभाजीराव गोखले, दिवगंत शिवाजीराव ओहळे (परतवाडा), शिवराय अजय सामदेकर,(अमरावती), शिवराय रवींद्र देशपांडे, (नागपूर), शिवाजी जोशी सर, अमरावती, शिवराय प्रथमेश वानखडे, प्रसाद शिवाजी जोशी, अशी उदाहरणं देत वानगी दाखल एवढे पुरेसे असल्याचं म्हणत कुलकर्णींनी भुजबळांना कोपरखळी मारली आहे.

नावांची यादी द्या : ब्राह्मण समाजातील नावांची उदाहरणे दिल्यानंतर भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी भुजबळांकडे त्यांच्या गोतवळ्यातील नावांची यादी मागितली आहेत. कोणी- कोणी भुजबळ कुटुंबात ज्योतिबा, सावित्री, भीमराव,अण्णाभाऊ, शाहू, लहुजी, मोहनदास, जवाहरलाल यांची नावे ठेवली आहेत, अशी विचारणादेखील त्यांनी केलीय. किती लोकांनी आणि किती समाजाने नावे महापुरुषांवरुन ठेवली त्यावरुन समाजाचे मुल्यमापन होत नाही. एखाद्याने महापुरुषाचे नाव ठेवलं नाही, याचा अर्थ ते महापुरुषांचा आदर करत नाहीत, असा त्याचा अर्थ होत नाही, असं ही कुलकर्णी म्हणालेत. तुमच्या माता-पित्यांनी तुमचे 'छगन' नाव का ठेवले ? या नावाला काही अर्थ आहे का? असा प्रश्नही शिवराय कुलकर्णींनी केलाय.

काय म्हणाले होते भुजबळ : नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत समाज दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळांनी हे वादग्रस्त विधान केलं. यावेळी ते संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना त्यांनी हे विधान केलं. संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो.खरंतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण ब्राम्हण समाजात संभाजी व शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र मुद्दाम संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती.

हेही वाचा-

  1. Ajit Pawar News : पक्ष मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचा 'धडाका' ; पक्षातील मंत्र्यांवर आहे 'या' जिल्ह्यांची जबाबदारी
  2. Sambhaji Bhide Case : संभाजी भिडे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
  3. Chhagan Bhujbal On Politics : राजकारण हा संभ्रमाचा खेळ : छगन भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.