ETV Bharat / state

भाजप आमदार सुनील देशमुख, बाळासाहेब थोरातांमध्ये 'बंदद्वार' चर्चा

माध्यमांशी बोलताना काँग्रस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Aug 26, 2019, 3:10 PM IST

Updated : Aug 26, 2019, 6:05 PM IST

14:55 August 26

सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या काळात पालकमंत्री व आमदारपद उपभोगले आहे

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यभर सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून आजपासून महापर्दाफाश यात्रा अमरावतीमधून सुरू झाली. दरम्यान यात्रा सुरू होण्यापूर्वी अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. काही काळ दोघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. दरम्यान, ही भेट राजकीय नसून आमची सुनील देशमुख यांच्याशी मैत्री आहे, म्हणून ते भेटायला आले असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले.

सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या काळात पालकमंत्री व आमदारपद उपभोगले आहे. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली. त्यामुळे सुनील देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सुनील देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करत गेल्या निवडणुकीत विजय मिळवला. मात्र आता सुनील देशमुख यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे आधीपासूनच काँग्रेस विचारसरणीचे देशमुख हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का ? हा प्रश्न या भेटीने उपस्थित होत आहे.

Intro:भाजपाचे आमदार सुनील देशमुख यांनी घेतली बाळासाहेब थोरातांची भेट.ही भेट राजकीय नाही थोरातांचे स्पष्टीकरण ..

अमरावती अँकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य भर सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी काँग्रेस कडून आजपासून महापर्दाफाश यात्रा ही अमरावती मधून सूरु झाली दरम्यान यात्रा सुरू होण्यापूर्वी अमरावती येथील शासकीय विश्राम गृहात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट भाजपचे आमदार डॉ सुनील देशमुख यांनी घेतली. काही वेळ बंद द्वार झालेल्या या चर्चे मुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले. दरम्यान ही भेट राजकीय नसून आमची सुनील देशमुख यांच्याशी मैत्री आहे म्हणून ते भेटायला आले असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले.

सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या काळात पालकमंत्री व आमदारकी भोगली आहे. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना  विधानसभा निवडणूकित उमेदवारी मिळाली त्यामुळे सुनील देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता .मात्र त्यानंतर सुनिल देशमुख यांनी भाजपात प्रवेश करत गेल्या निवडणूकित विजय मिळवला होता. मात्र आता सुनील देशमुख हे भाजपात त्यांची कोंडी होत असल्याचं बोलल्या जाते. त्यामुळे आधीपासूनच काँग्रेस विचारसरणीचे देशमुख हे पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करतील का ???हा प्रश्न या भेटीने उपस्थित होत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 26, 2019, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.