ETV Bharat / state

भाजप-सेनेने मेळघाटात उधळला पैसा? भाजप जिल्हाध्यक्षाची ऑडिओ क्लिप व्हायरल

author img

By

Published : Apr 29, 2019, 6:26 PM IST

Updated : Apr 29, 2019, 9:10 PM IST

मेळघाटात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैशांच्या वाटपासंदर्भात दिनेश सुर्यवंशी आणि जवांदे यांच्यात निवडणूक काळात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे.

दिनेश सुर्यवंशी

अमरावती - भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यातील संवादाची क्लिप गाजत असताना आता पुन्हा एकदा नवी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मेळघाटात खुलेआम पैसे वाटप केल्याचे या ऑडिओ क्लिपद्वारे स्पष्ट होत आहे.

संवादाची क्लिप

मेळघाटात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैशांच्या वाटपासंदर्भात दिनेश सुर्यवंशी आणि जवांदे यांच्यात निवडणूक काळात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये सुर्यवंशी हे अतिशय शांत सुरात बोलायला सुरुवात करतात. 'जास्तीत जास्त बूथ प्रमुख आपले आहेत. शिवसेनेकडे बुथ प्रमुख नाहीत', असे सुर्यवंशी यांनी म्हणताच समोरून जावंदे नावाचा व्यक्ती म्हणतो, 'साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे निम्मे भाजपला द्या आणि निम्मे शिवसेनेला द्या. भाजपचे वाटताना शिवसेनेवाले समोर राहतील आणि काही शिवसेनेचे वाटताना भाजपवाले समोर राहतील. जेणेकरुन दोघांनाही पोहोचले पाहिजे हे आपले नियोजन आहे. त्याच पद्धतीने आज काम केले साहेब'. यानंतर सुर्यवंशी आणि जावंदे यांच्यात अडीच हजार रुपये बुथप्रमुखासह शक्तिकेंद्र प्रमुखांच्या वार्तालापाबाबतही चर्चा आहे. आमच्याकडे भाजपमध्ये शक्तिकेंद्र प्रमुखाला वैयक्तिक पैसे दिले जातात. आज आपण वैयक्तिक पैसे दिले नाहीत, असे सुर्यवंशी म्हणतात. यावर जावंदे म्हणतात 'शक्तिकेंद्र आता निवडणुकीत अस्तित्वात आले. 'यावर सुर्यवंशी म्हणतात, 'सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होते तेव्हापासून शक्ती केंद्र आहेत'. यावर जावंदे म्हणतात, 'मी पण भाजपचा जिल्हाध्यक्ष होतो असे काही नव्हते'. यावर सुर्यवंशी म्हणतात 'तुमचा अभ्यास कमी पडतो सोडा.

'वाटून टाकले आता पैसे आता काय राहिला प्रश्न मुळात इतके सांगा'. असा प्रश्न जावंदे विचारतात. तेव्हा सुर्यवंशी म्हणतात, ठिक आहे आम्हाला आमच्या संघ परिवाराकडून फिडबॅक आला. ते आमच्यात बोलत नाही आणि आम्हीही त्यांच्यात बोलत नाही. पण मेळघाट हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा पट्टा आहे. आता फिडबॅक असा आला की जे अडीच हजार रुपये तुम्हाला दिले हे अपुरे पडत आहेत. ५ हजार अपुरे पडतात. हे मी पालकमंत्र्यांही कळवले. विषय असा आहे आपले जे ५ हजार रुपये आहेत. हे खालपर्यंत गेले नाहीत. मी आता साळवींना बोललो. हा फिडबॅक आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना आपण विजयी व्हावे असे वाटते.

सुर्यवंशी यांचे लांबलचक म्हणणे ऐकल्यावर जावंदे म्हणतात,' साहेब दोन्ही कडून १०० टक्के काम झालेले नाही. मी फिडबॅक घेतो आहे. भाजप आणि सेनेचेही १०० टक्के काम नाही आहे. मी आजही राणीगाव सर्कलमध्ये आहे आणि तुमचा धारणी तालुका अध्यक्ष घरी जाऊन झोपला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे, मी सकाळी १० वाजता त्यांच्या घरी सगळ्या बुथचे पैसे पोहोचवून आलो. ते वाटायला लोक दुपारी साडेतीनला निघत असतील तर या टाईम गॅपला टाईम पास म्हणायचे का? आप्पानी झिरो काम केले आहे. माझा हा आरोप आहे आणि मी आपल्या भाजपच्या कार्यालयाकडे सांगणार आहे. पाणी अति डोक्यावरुन गेले आहे साहेब, तुम्ही त्यांचे अतिशय लाड केलेत इतके कोणी करत नाही. १५ दिवसात तो ४ ते ५ वेळा अमरावतीला गेला आहे. त्याने काम केले नाही, आम्ही त्याची एक रुपयाचीही तक्रार केली नाही साहेब, असे जावंदे म्हणताच सुर्यवंशी यांचा बोलण्याचा सूर बदलतो. सुर्यवंशी अतिशय चिडून म्हणतात, आम्ही तुमचे काही नोकर नाही, आमची तक्रार करायची नाही. लाड पुरवतो, गीड पुरवतो शब्द नीट वापरा जरा. नोकर नाही हाकलून देईन तिथून मी उद्याच्या उद्या एक बूथ काम नाही करणार. तुमच्या बापाच्या जीवावर करतो का आम्ही. आम्हाला धमकवायला आले का तिथे. एक मिनिटात हाकलून देईन, एक काम करणार नाही तिथे कुणी. तुम्हाला अक्कल आहे का काही. त्या राज ठाकरेंनी तिथे हरिसालचा पोरगा दाखवला सभेमध्ये त्याच्यासाठी आम्हाला दोन दिवस घालवावे लागले अक्कल आहे का, तुम्हाला काही. 'you are not my boss' ऐका मिनिटात धारणी सोडा आता, अशा शब्दात सुर्यवंशी जावंदे यांना दम देत असल्याचे या ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला येते.

जावंदे ही व्यक्ती अडसूळांनी निवडणूक नियोजनासाठी मुंबईवरुन आणलेल्या टीमचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्यवंशी आणि जावंदे यांच्या संवादाची ही क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. निवडणुकीत पैशांचा वाटप झाले आणि पैशांसाठी आपसात वादही झालेत, असे क्लिपमुळे स्पष्ट होत आहे.

Intro:( ऑडिओ क्लिप व्हाट्सअँप वर पाठवतो)

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा दिनेश सुर्यवंशी आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यातील संवादाची क्लिप गाजत असताना आता पुन्हा एकदा नवी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मेळघाटात खुलेआम पैसे वाटप केल्याचे या ऑडिओ कॅलिपद्वारे स्पष्ट होत आहे

Body:मेळघाट भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पैशांच्या वाटपासंदर्भात प्रा. दिनेश सुर्यवंशी आणि जवांदे यांच्यात निवडणूक काळात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप आता व्हायरल झाली आहे.
या क्लिपमध्ये प्रा. दिनेश सुर्यवंशी हे अतिशय शांत सुरात बोलायला सुरुवात करतात. 'जास्तीस्त बूथ प्रमुख आपले आहेत. शिवसेनेकडे बुथप्रमुख नाहीत'. असे सुर्यवंशी यांनी म्हणताच समोरून जावंदे नामक व्यक्ती म्हणतो, ' साहेब तुम्ही संगीतल्याप्रमाणे निम्मे भाजपला द्या आणि निम्मे शिवसेनेला द्या.भाजपचे वाटताना शिवसेनेवले समोर राहतील आणि काही शिवसेनेचे वाटताना भाजपवले समोर राहतील. जेणेकरुन दोघांनाही पोचले पाहिजे हे आपलं नियोजन आहे .त्याच पद्धतीने आज केलं साहेब'.
यानंतर सुर्यवंशी आणि जावंदे यांच्यात अडीच हजार रुपये बुथप्रमुखासह शक्तिकेंद्र प्रमुखांना वातपाबाबतही चर्चा आहे. आमच्याकडे भाजपमध्ये शक्तिकेंद्र प्रमुखाला वयक्तिक पैसे दिले जातात आज आपण वयक्तिक पैसे दिले नाहीत असे सुर्यवंशी म्हणतात. यावर
जावंदे म्हणतात 'शक्तिकेंद्र आता निवडणुकीत अस्तित्वात आले.' यावर सुर्यवंशी म्हणतात 'सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होते तेव्हापासून शक्ती केंद्र आहेत'. यावर जावंदे म्हणतात 'मी पण भाजपचा जिल्हाध्यक्ष होतो असे काही नव्हते'. यावर सुर्यवंशी म्हणतात 'तुमचा अभ्यास कमी पडतो सोडा.
'वाटून टाकले आता पैसे आता काय राहिला प्रश्न मुळात इतकं सांगा'. असा प्रश्न जावंदे विचारतात तेव्हा सुर्यवंशी म्हणतात, ठीक आहे आम्हाला आमच्या संघ परिवाराकडून फीडबॅक आला. ते आमच्यात बोलत नाही आणि आम्हीही त्यांच्यात बोलत नाही. पण मेळघाट हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा पट्टा आहे. आता फीडबॅक असा आला की जे अडीच हजार रुपये तुम्हाला दिले हे अपुरे पडत आहेत. पाच हजार अपुरे पडतात हे मी पालकमंत्र्यांही कळवलं.विषय असा आहे आपले जे पाच हजार रुपये आहेत हे खालपर्यंत गेले नाही आहेत.मी आता साळवींना बिललो. हा फीडबॅक आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यांना काही त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यांना आपण विजयी व्हावं आणि आपल्या सिस्टीम मधल्या गॅप असल्या की ते पटकन सांगतात.'
सुर्यवंशी यांचं लांबलचक म्हणणं एकल्यावर जवांदे म्हणतात,' साहेब दोन्ही कडून शंभर टक्के काम झालेलं नाही मी फीडबॅक घेतो आहे. भाजप आणि सेनेचेही शंभर टक्के काम नाही आहे. मी आजही राणीगाव सर्कलमध्ये आहे आणि तुमचा धारणी तालुका अध्यक्ष घरी जाऊन झोपला आहे.दुर्दवी बाब म्हणजे , मी सकाळी १० वाजता त्यांच्या घरी सगळ्या बुथचे पैसे पोचवून आलो. ते वाटायला लोक दुपारी ३.३० ला निघत असतील तर या टाइम गॅप ला टाईम पास म्हणायचं का? आप्पानी झेरो काम केलं आहे. माझा हा आरोप आहे आणि मी आपल्या भाजपच्या कार्यालयाकडे सांगणार आहे पाणी अति डोम्यावरून गेलं आहे साहेब, तुम्ही त्यांचे अतिशय लाड केलेत इतकं कोणी करत नाही. १५ दिवसात तो ४ ते ५ वेळा अमरावती गेला आहे. त्याने काम केलं नाही आम्ही त्याची एक रुप्याचीही तक्रार केली नाही साहेब.'
असे जावंदे म्हणताच दिनेश सुर्यवंशी यांचा बोंलण्याचा सूर बदलतो. सुर्यवंशी अतिशय चिडून म्हणतात,' तुमचे काही नौकर नाही आम्ही आमची तक्रार करायची नाही.लाड पुरवतो, गीड पूरतो शब्द नीट वापरा जरा. नौकर नाही हाकलून देईन तिथून मी उद्याच्या उद्या एक बूथ काम नाही करणार तुमच्या बापाच्या जीवावर करतो का आम्ही. आम्हाला धमकवायला आले का तिथं. एक मिनिटात हाकलून देईन एक काम करणार नाही तिथं कुणी.तुम्हाला अक्कल आहे का काही. त्या राज ठाकरेनी तिथे हरीसालचा पोरगा दाखवला सभेमध्ये त्याच्यासाठी आम्हाला दोन दिवस घालवावे लागले अक्कल आहे का तुम्हाला काही. you are not my boss ऐका मिनिटात धारणी सोडा आता' आशा शब्दात सुर्यवंशी जावंदे यांना दम देत असल्याचे या ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला येते.
जावंदे ही व्यक्ती अडसुळांनी निवडणूक नियोजनासाठी मुंबईवरून आणलेल्या टीमचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रा. दिनेश सुर्यवंशी आणि जावंदे यांच्या संवादाची ही क्लिप व्हायरल होत असून निवडणुकीत पैशांचा वाटप झाला आणि पैशांसाठी आपसात वादही झालेत असे क्लिपमुळे स्पष्ट होत आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.