अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या तिसरा लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले आहेत. आज (रविवार) अमरावती विभागतील पाचही जिल्ह्यांमध्ये अससणाऱ्या बिहारी मजुरांना रेल्वेने पटनाला पाठवण्यात आले. अमरावती रेल्वे स्थानकावरून 24 डब्यांची विशेष गाडी दुपारी 2 वाजता पटनाकडे रवाना झाली.
विशेष रेल्वेने बिहारी मजूर अमरावतीवरुन पटनाल रवाना शनिवारी उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी विशेष गाडी सुटल्यावर आज बिहार राज्यातील मजुरांना घेऊन विशेष गाडी धावली. कोरोनामुळे सगळे कामं ठप्प पडल्याने बिहार राज्यातील मजुरांची चांगलीच गोची झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या मजुरांनी आम्हाला आमच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांसाठी सलग दोन दिवस स्वतंत्र अशा दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या. आज विभागीय आयुक्त पियूष सिंह आणि जिल्हाधिकारी ही गाडी सुटताना उपस्थित होते. सर्व प्रवाशांना नानक रोटी टेस्टच्या वतीने जेवणाचा डबा, पिण्याचे पाणी आणि मास्क वितरित करण्यात आले. गाडी सुटताना राज्य राखीव पोलीस दलाच्या बँड पथकाने देशभक्तीपर गाण्यावर धून वाजवून वाजवून वातावरणात उत्साह निर्माण केला होता.
या विशेष गाडीद्वारे 1हजार 200 च्या वर बिहारी मजूर आपल्या स्वगृही परतले. ज्या मजुरांनी नोंदणी केली नव्हती, आशा दोनशे ते तीनशे मजुरांना रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश दिला गेला नाही.