अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे (Amravati University) कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे (Vice Chancellor Dr Dilip Malkhede) यांची बदनामी करणारे पत्रक विद्यापीठ परिसरात वाटण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पत्रकाचा आशय असा आहे की एक प्राध्यापिका बंगल्यावर यायची हा कार्यक्रम त्यांच्या पत्नीच्या आक्षेपामुळे बंद, ओळखापाहू प्राध्यापिा काेण? असा आहे. सोबतच विद्यापीठ क्षेत्र आणि इतरत्रही सोशल मिडियावर 'काय झालं म्हणते अमरावती मधे ... गुरु सापडला म्हणते 'ती' च्या सोबत... काय बाप्पा शोभते का तुम्हाला हे' अशा पोष्ट सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने अशा पत्रकांचे नामोनिशान मिटवले आहे. मात्र कोणतीच अधिकृत भुमिका जाहिर न केल्यामुळे संशय बळावत आहे. तसेच विद्यापीठाची बदनामी होत असल्यामुळे वाद चिघळण्याचे चिन्ह निर्माण झाल आहे.
असा आहे पत्रकांमधील मजकूर : प्राध्यापिकेचा आव हवेली पे ( कुलगुरू बंगला ) येण्याचा कार्यक्रम कुलगुरू पत्नीच्या हस्तक्षेपामुळे बंद. (ओळखा पाहू प्राध्यापिका कोण? ) अशा आशयाची अनेक पत्रके विद्यापीठ परिसरात बुधवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आली. ही पत्रके परिसरात वितरित होताच सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून ती सर्व पत्रक गोळा करून तात्काळ जाळण्यात आली.
उलट सुलट चर्चांना उधाण : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे (Sant Gadgebaba Amravati University) कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे हे सातत्याने आजारी असतात. मात्र त्यांच्या अनेक निर्णयामुळे विद्यापीठातील प्राध्यापक तसेच अधिकारी आणि कर्मचारी नाराज आहेत. यामुळेच कुणीतरी खोडसापणा म्हणून अशी पत्रके वाटली असेही बोलल्या जात आहे. यासह असा प्रकार वास्तवात घडला त्यामुळेच अशी पत्रक वाटण्याचे धाडस काही मंडळींनी केले अशी कुरबुर देखील विद्यापीठ परीसरात आहे.
सोशल मीडियावरही पोस्ट : 'काय झालं म्हणते अमरावती मध्ये गुरु.. सापडला म्हणते 'ती "च्यासोबत काय बाप्पा शोभते का तुम्हाला हे .. ' अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेक कॉमेंट्स येत असून यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची प्रचंड बदनामी होत आहे. दरम्यान या प्रकरणानंतर कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांना बरे वाटत नसल्यामुळे ते रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. इतका गंभीर प्रकार समोर आल्यावर देखील विद्यापीठ प्रशासनाने अद्याप या प्रकरणात कुठलीच कारवाई केली नाही तसेच याबाबत पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली नाही त्यामुळे चर्चा आधिकच रंगत आहेत.