अमरावती : अकराळ विक्राळ स्वरूपाची बहिरम बाबांची मूर्ती मंदिरात विराजमान आहे. सुरुवातीला सुपारी च्या स्वरूपात या मंदिरात भैरवाची पूजा केली जायची. (Bahiram Yatra Began) आज त्याच सुपारीने भव्य स्वरूप घेतले असल्याचे सांगितले जाते. या मंदिरा संदर्भात सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार सालबर्डी येथून शंकर आणि पार्वती पचमढीला जात असत. तीन दिवसांच्या प्रवासात ते या या भागात मुक्काम करायचे. (Bahiram Yatra) त्यावेळी शंकर-पार्वतीला आंघोळीसाठी हव्या असणाऱ्या काशीच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या परिसरात तलाव खोदण्यात आला हा तलाव आजही या परिसरात काशी तलाव म्हणून अस्तित्वात आहे. तसेच मंदिरालगत असणारा तलाव हा भांडे तलाव म्हणून ओळखला जातो. ( bahiram yatra amaravati ) या तलावात पावसाळ्यात पाणी आले की ते होईपर्यंत आटत नाही. पूर्वी या तलावातून भांडी बाहेर यायची म्हणून या तलावाचे नाव भांडे तलाव असल्याचे सांगण्यात येते शंकर आणि पार्वती सोबत असणाऱ्या बहिरम नावाच्या एका भैरवाने या स्थानाचा उद्धार व्हावा अशी कल्पना शंकराकडे व्यक्त केली तेव्हा या स्थानावर तुझ्या रूपाने माझा वास राहील असा शंकराने बहिरमाला आशीर्वाद जिल्ह्याची आख्यायिका आहे. ( crowd increased After two years in amaravati )
असे आहे यात्रेचे वैशिष्ट्य : बहिरम या स्थानाबाबत विविध आख्यायिका असल्या तरी या ठिकाणी भाविक गत अनेक वर्षांपासून बहिरम बाबांच्या दर्शनाला येतात. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात पीक आल्यावर आणि हाती पैसा आला की शेतकरी बहिरमच्या यात्रेला यायचे शेतीची अवजारे खरेदी विक्रीसाठी बहिरम यात्रा ही महत्त्वाचे केंद्र होती. फार पूर्वीच्या काळी आगीचे टेंभे लावून रात्री ही यात्रा भरायची. यात्रेत फार मोठा बैलांचा बाजार देखील भरायचा. लाकडी साहित्य विक्रीचे ही यात्रा प्रमुख केंद्र होती. लगतच्या मेघाटातील आदिवासी बांधवांचे बहिरम बाबा हे कुलदैवत आहे. त्यामुळे या यात्रेत आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मध्यंतरी अनेक वर्षांपर्यंत बहिरम बाबाला बोकड आणि कोंबडीचा नवस देण्याची परंपरा होती. आता मात्र मंदिर परिसरात प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे ही यात्रा बंद होती आता यावर्षी पुन्हा एकदा हा परिसर यात्रेनिमित्त बहरला असून वीस डिसेंबरला बहिरम बाबा मंदिरात होम हवन करून यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा 30 जानेवारीपर्यंत चालणार असून मंदिर संस्थेच्या वतीने भाविकांना कुठलीही अडचण जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली ची माहिती बहिरम बाबा संस्थेचे अध्यक्ष देविदास चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
एक जानेवारीपासून बहरणार यात्रा : नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त अमरावती जिल्ह्यासह नागपूर अकोला वाशिम जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक बहिरमच्या यात्रेला येतात. 31 डिसेंबर आणि एक जानेवारीला या यात्रेत प्रचंड गर्दी असते. एक जानेवारीपासून बहिरमची यात्रा खऱ्या अर्थाने बहरते. यात्रेत अनेक वर्षांपासून लागणाऱ्या टूरीन टॉकीज यावर्षी देखील लागले असून हजारो आदिवासी बांधव या यात्रेत विविध सिनेमा पाहण्याचा आनंद लुटतात. यावर्षी एक जानेवारीपासून यात्रेत सर्कस देखील लागणार आहे. पूर्वी बहिरम बाबाला मटणाचा नैवेद्य वाहिल्या जायचा. महाडा वर असणाऱ्या बहिरम बाबाच्या मंदिराच्या पायऱ्यांवरून आधी बोकड कोंबडी कापल्यामुळे रक्ताचे पाठ व्हायचे मात्र ही प्रथा बंद करण्यात आली आहे . असे असले तरी या यात्रेच्या परिसरात मटण आणि रोडगे खाण्यासाठी अनेक खवय्ये मोठ्या संख्येने येतात. अनेक वर्षांपासून सातपुड्याच्या कुशीत भरणाऱ्या या यात्रेचे पूर्वीचे आणि आताचे स्वरूप बदलले असले तरी या यात्रेची प्रतिष्ठा, वैभव मात्र कायम आहे.