ETV Bharat / state

Bachu Kadu : जाती धर्माच्या झेंड्याशिवाय, देशात चार वेळा अपक्ष निवडून येणारा मी आमदार - बच्चू कडू

author img

By

Published : Dec 14, 2022, 1:51 PM IST

अपक्ष म्हणून चार वेळा निवडून येण्याचा मी देशात इतिहास रचला ( Elected Independent MLA Four Time Is History ) असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. अमरावतीत धामणगाव रेल्वे तालुक्यात पिंपळखुटा येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनात त्यांनी हजेरी लावली होती.

Bachu Kadu
बच्चू कडू

अमरावती : जात आणि धर्म लावला तर पक्ष सहज ( Party Grows Because Of Caste And Religion ) वाढतो. मधल्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा अशा काही घोषणा दिल्या. मात्र ते इकडे कुठेही नाहीत असा टोला राज ठाकरे यांना लावीत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी लावीत केवळ बोलल्याने मते मिळत नाहीत, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले ( MLA Bachu Kadu Amravati ) आहे.

चार वेळा अपक्ष निवडून येणे इतिहास : महाराष्ट्रातल्या लोकांनी मनसेला तेरा आमदार निवडून दिले होते. मात्र आज महाराष्ट्र त्यांना विसरून गेला आहे. बच्चू कडू चारदा निवडून आला त्यासाठी त्याने जातीचे किंवा धर्माचे सोंग घेऊन कुठलाही झेंडा हाती घेतला नाही. कुठला नेता देखील बोलावला नाही. सामान्य माणसांनी एकदा नव्हे तर चारदा अपक्ष म्हणून मला निवडून दिले. अपक्ष म्हणून चार वेळा निवडून येण्याचा मी देशात इतिहास रचला ( Elected Independent MLA Four Time Is History ) असे आमदार बच्चू कडू यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यात पिंपळखुटा येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनात बोलताना म्हटले आहे.

कार्यकर्त्यांच्या ताकतीवर निर्माण केला विश्वास : आम्ही अनेक अपंग आजारी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी मदत केली आहे. लाखो रुपये खर्च आम्ही केले. मात्र कुठेही आम्ही गरिबांना केलेल्या मदतीचा गवगवा केला नाही. सर्वसामान्य व्यक्तींना बच्चू कडू हा आपल्या घरातला असल्याचा विश्वास पटला यामुळेच मी सलग चार वेळा निवडून आलो. माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच समाजात आमच्या बाबत विश्वास निर्माण झाला असे देखील आमदार बच्चू कडू यावेळी म्हणाले.

तर आमचे दहा आमदार निवडून आले असते : आमच्या प्रहार पक्षाने मंदिर मज्जिदचे वाद निर्माण केले असते तर आज आमचे दहा आमदार निवडून आले असते असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. धर्माच्या नावावर लोक पेटून उठतात मात्र मी शेतकऱ्यांसाठी लढलो तर मला आंदोलनासाठी माणसे सापडली नाहीत. अशावेळी अनेक जण केवळ मजा पाहतात. मंदिर मशिदीत लोक जातात मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन कोणी काम करीत नाहीत. मात्र आम्ही सर्व ठिकाणी जाऊन समाज कार्य करतो असे बच्चू कडू म्हणाले.

सामान्य माणसांचा विचार हाच आमचा अजेंडा : आम्ही कधीही राजकारण केले नाही केवळ समाजकारण म्हणून आम्ही वावरत आलो आहोत. सामान्य माणसाचा विचार हाच प्रहारचा अजेंडा आहे. राज्यातील अपंगांचे संघटन बांधण्यासाठी मी राज्यभर फिरलो. असे देखील बच्चू कडू म्हणाले.

ठाकरेंना विचारा किती गुन्हे दाखल : अपंगांच्या वेदना शासन दरबारी मांडल्या यासाठी माझ्यावर एकूण साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. राज ठाकरेंना विचारा त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. राज ठाकरे प्रमाणेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील त्यांच्यावर अशा स्वरूपाचे किती गुन्हे दाखल आहेत असे जाहीर करावे असे देखील बच्चू कडू म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.