ETV Bharat / state

Arvind Sawant : खासदार अरविंद सावंतांकडून नवनीत राणांचा चक्क जातचोर म्हणून उल्लेख - Thackeray group mashal melava in Amravati

उद्धव ठाकरे गटाचा मशाल जनसंवाद मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप अरवींद सावंत यांनी केला. खासदार नवनीत राणा ह्या विकासापासून दूरच असल्याचा टोला.

MP Arvind Sawant
खासदार अरविंद सावंत
author img

By

Published : Jan 11, 2023, 7:36 PM IST

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा ह्या विकासापासून दूरच असल्याचा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. शिंदे फडवणीस सरकारवर टीका करत हे सरकार घटनाबाह्य असल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी यावेळी केला. अमरावती जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अमरावतीत बोलत होते.

जनसंवाद मेळावा : अरविंद सावंत बोलतांना पुढे म्हणाले की, सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. त्याविषयी कोणालाही चिंता नाही. शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी संजय राऊत यांच्यासोबत दिल्लीला गेलो होतो. तेव्हा त्या शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चिकाटी आम्हाला दिसली होती. त्या चिकाटीमुळे सरकारला त्या आंदोलनातून माघार घ्यावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले. होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसैनिकांनो सज्ज रहा अशा सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना दिल्यात. प्रास्ताविकातून नवनिर्वाचित संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी म्हणाले की, शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रत्येक वार्डात जाऊन शिवसेना काय आहे, ते समजावून सांगायचे आहे. आपल्यामधील त्रुटी किंवा उणिवा काय आहेत त्या भरून काढायच्या आहेत. तसेच त्यावर उपाय शोधून उपाययोजना करायच्या आहेत.

कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश : अमरावतीमधील बेनोडा प्रभागातील संजय गोंडाने यांच्यासह निलेश आघाडे, योगेश ठाकरेंचा आणि मोर्शी तालुक्यातील निंभी या गावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश समारंभ यावेळी ( ncp workers join Thackeray group ) झाला. खासदार अरविंद सावंत म्हणाले की, नुसता भगवा खांद्यावर घेऊन जमणार नाही. तर, आता धगधगत्या आणि पेटलेल्या मशालीसोबत आपण उभे राहिले पाहिजे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आरोग्य सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपण मागे पडलो असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला अत्याचार,शेतकरी आत्महत्या ,महागाईवर सरकार काहीच बोलत नाही हे सगळे प्रश्न असताना सुद्धा सरकार त्याकडे नीट लक्ष घालत नाही.

शिंदे फडणवीस सरकार घटना बाह्य : शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य असून हे सरकार घटनाबाह्य काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकरी आंदोलनातून सरकारला माघार घ्यावी लागते हे केंद्र सरकारचे अपयश असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका : खासदार नवनीत राणा यांच्या जोरदार टीका ( Arvind Sawant Criticize Navneet Rana ) करत ख. सावंत म्हणाले की, त्या जात चोरणाऱ्या खासदार असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. येथील खासदारांना विकासाची काही एक देणे घेणे नसून त्या आपल्या सौंदर्याने इतरांना घायाळ करण्यातच व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्यात.यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख मनोज कडू, श्याम देशमुख, सुनील खराटे , माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील , दिनेश बूब, माजी शिक्षक आमदार वसंत मालधुरे,माजी खासदार अनंत गुढे सर्वच तालुक्याचे प्रमुख उमेश घुरडे शहर प्रमुख पराग गुळधे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.