ETV Bharat / state

अप्पर वर्धा धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय ऐन वेळी रद्द, अमरावतीत पाण्यावरुन राजकारण तापले

तिवसा तालुक्यासाठी मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय ऐन वेळी रद्द केल्याने अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

wardha
author img

By

Published : May 13, 2019, 1:40 AM IST

अमरावती - तिवसा तालुक्यासाठी मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय ऐन वेळी रद्द केल्याने अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे. रविवारी रात्री १२ वाजता धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येणार होते. मात्र पाणी सोडण्याच्या काही तासांपूर्वी प्रशासनाने अचानक आपला निर्णय रद्द केला. या निर्णयामुळे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे आमदार अनिल बोंडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.

yashomati thakur

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवसा तालुक्यात वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होतो, परंतु वर्धा नदीचे पाणी आटल्याने येथे दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. पाण्यासाठी होत असलेली वणवण थांबण्यासाठी जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार आज रविवारी रात्री 12 अप्पर वर्धा धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येणार होते. तसा आदेश अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता मात्र अचानक रविवारी अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याच्या काही तासांवर अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने रद्द केला. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी सकाळी अप्पर वर्धा धरणात शेकडो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. तर धरणातून पाणी सोडण्याबाबत उद्या बैठक असल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु पाणी सोडण्यावरून अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

दोन वर्षांपासून जिल्हात कमी पाऊस झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न यंदा गंभीर झाला आहे. वर्धा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे आटल्याने दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. वर्धा नदी पात्रातून तिवसा,मोर्शी, धामणगाव रेल्वे तालुक्याला पाणी पुरवठा होतो मात्र नदी पात्रातील पाणी संपल्याने दुष्काळ निर्माण झाला होता. त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजता अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता. नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र ऐन पाणी सोडण्याच्या काही तासांपूर्वी रात्री 9 वाजता अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे यावर आता राजकारण चांगलेच तापले असून सोमवारी सकाळपर्यंत पाणी न सोडल्यास आपण स्वतः शेकडो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

हा तर आमदार अनिल बोंडेचा कारनामा

मी पाणी सोडण्याबाबत प्रयत्न केले. पण माझं काम भाजप वाल्यांना पचत नाही. आमदार अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला. शेतकऱ्यांचे, लोकांचे महत्व त्यांना कळत नाही. उद्या सकाळपर्यंत पाणी न सोडल्यास त्या धरणात कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेईल, असा असा इशारा तिवसा विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा इशारा दिला आहे.

राजकारणासाठी यशोमतींनी हट्ट धरणे बंद करावे

त्या धरणातील पाणीसाठा हा रब्बी पिकांसाठी आरक्षित आहे. पाणी जर आता सोडले तर त्याचे बाष्पीभवन होईल. पाणी नदीत मुरेल व त्याचा उपयोग होणार नाही. यशोमती ताईंनी अपर वर्धा धरणाच्या पाणीपुरवठा समितीशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी असा हट्ट धरणे चुकीचे आहे, असे वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले.

Intro:अप्पर वर्धा धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय येणं वेळी रद्द ,प्रशासनाचे घुमजाव.

पाण्यावरून राजकारण तापले-आ यशोमती ठाकूर विरुद्ध आ अनिल बोंडे वाद पेटला

--------------------------------------------------------

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील पाण्याचा दुष्काळ निर्माण आहे तिवसा तालुक्यात वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत असल्याने वर्धा नदीचे पाणी आटल्याने दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता पाण्यासाठी होत असलेली वणवण थांबण्यासाठी जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यामुळे आज रविवारी रात्री 12 अप्पर वर्धा धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येणार होते तसा आदेश अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता मात्र अचानक रविवारी अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याच्या काही तासांवर अप्पर वर्धा धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने रद्द केला त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांनी अप्पर वर्धा धरणाचे पाणी न सोडण्यात येतं असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी अप्पर वर्धा धरणात शेकडो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.तर धरणातून पाणी सोडण्याबाबत उद्या बैठक असल्याचं प्रशासकीय अधिकारी यांच्या कडून सांगण्यात येत आहे.परंतु पाणी सोडण्यावरून मात्र अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांन मध्ये चांगलीच जुंपली असुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहे.

    दोन वर्षांपासून जिल्हात कमी पाऊस झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न यंदा गंभीर झाला आहे,वर्धा नदी पात्रातील पाणी पुर्णपणे आटल्याने दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे वर्धा नदी पात्रातून तिवसा,मोर्शी, धामणगाव रेल्वे तालुक्याला पाणी पुरवठा होतो मात्र नदी पात्रातील पाणी संपल्याने पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला होता त्यामुळे रविवारी रात्री12 वाजता अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता तसे आदेशही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता .त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाचे वतीने देण्यात आला होता नदी काठावरील गावात दवंडी देऊन अलर्ट देण्यात आला होता .मात्र आज रविवारी रात्री 12 पाणी सोडण्यात येणार होते मात्र रात्री 9 वाजता येन पाणी सोडण्याच्या काही तासांवर अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला त्यामुळे यावर आता राजकारण चांगलेच तापले असून अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याने सोमवारी सकाळ पर्यंत पाणी न सोडल्यास मी स्वतःहा शेकडो कार्यकर्त्यांन सह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
---------------------------------------------------------------
हा तर आमदार अनिल बोंडेचा कारणामा
मी पाणी सोडण्याबाबत प्रयत्न केले,लोकांची मागणी आहे.पण माझं काम भाजप वाल्याना पचत नाही.आमदार अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव आणला ,शेतकऱ्यांच ,लोकांचं महत्व यांना कळत नाही.उद्या सकाळ पर्यंत पाणी न सोडल्यास मी त्या धरणात कार्यकर्त्यां सह जलसमाधी घेईल 
आमदार यशोमती ठाकूर.काँग्रेस
तिवसा विधानसभा

---------------------------------------------------
राजकारणासाठी यशोमतींनी हट्ट धरणे बंद करावे
त्या धरणातील पाणी साठा हा रब्बी पिकांसाठी आरक्षित आहे.अमरावती, मोर्शी,सह पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असतो.पाणी जर आता सोडले तर त्याच बाष्पीभवन होईल,पाणी नदीत मुरेल त्याचा उपयोग होणार नाही,यशोमती ताईनी अपर वर्धा धरनाची पाणीपुरवठा समिती आहे त्यात चर्चा करायला पाहिजे होती.त्यांनी असा हट्ट धरणे चुकीचे आहे.
आमदार अनिल bonde भाजप वरुड मोर्शी मतदार संघBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.