ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळाले पूर्ण विषयांची नावे असलेले ओळखपत्र

author img

By

Published : Oct 11, 2020, 12:19 PM IST

अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये घोळ असल्याचे 'ईटीव्ही भारत'ने समोर आणले होते. या बातमीनंतर विद्यापीठाकडून तत्काळ नव्याने पूर्ण विषयाची नावे असलेले ओळखपत्र बनवून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे.

अमरावती विद्यापीठ
अमरावती विद्यापीठ

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पाठवण्यात आलेल्या ओळखपत्रात अनेक विषयांची नावेच नसल्याचा धक्कादायक प्रकार ईटीव्ही भारतने उजेडात आणला होता. त्यानंतर या बातमी दखल अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतली असून आता या सर्व परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना सर्व विषयांची नावे नमूद असलेले ओळखत्र देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना मिळाले पूर्ण विषयांची नावे असलेले ओळखपत्र

कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या होत्या. दरम्यान आता येत्या सोमवारपासून या परीक्षा होणार आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ८ ऑक्टोंबरला परीक्षेचे ओळखपत्र पाठवण्यात आले होते. परंतु, त्या ओळखपत्रामध्ये अनेक विषयांची नावेच छापली नसल्याचा धक्कादायक प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला होता. या ओळखपत्रामध्ये काही विषयांची नावे नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ज्या विषयाचे नाव ओळखपत्रात नाही त्या विषयाचा पेपर होणार की नाही, अशी शंकासुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. दरम्यान घडलेल्या प्रकाराची बातमी ईटीव्ही भारतने प्रसारित केल्यानंतर त्याची दखल घेत अमरावती विद्यापीठाकडून तत्काळ नव्याने पूर्ण विषयाची नावे असलेले ओळखपत्र बनवून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे.

हेही वाचा - विद्यापीठाच्या परीक्षा ओळखपत्रात घोळ; अनेक विषयांची नावे छापलीच नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.