ETV Bharat / state

अमरावतीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, अकरा हजारांचा दंड वसुल

author img

By

Published : Apr 16, 2020, 10:34 AM IST

Updated : Apr 16, 2020, 1:30 PM IST

चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे व मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये संपुर्ण चांदूर रेल्वे शहरातून ताफ्यासह फिरून मास्क न बांधणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. यामध्ये ५७ लोकांकडून ११ हजार ४०० रूपयांची दंडाची वसुली करण्यात आली.

अमरावतीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
अमरावतीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर पडताना लोकांनी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरही अनेक जण मास्क न लावता आपल्यासह इतरांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत. अशांविरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस विभाग व नगर परिषदतर्फे कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ११ हजार रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले गेले आहे. परंतु, नागरिक काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. घराबाहेर पडत असताना अनेकजण मास्क, रूमाल बांधत नसून सोशल डिस्टन्सिंगचेसुध्दा पालन करीत नाहीत. त्यामुळे, प्रशासनाला कडक कारवाई करावी लागत आहे.

चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे व मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये संपूर्ण चांदूर रेल्वे शहरातून ताफ्यासह फिरून मास्क न बांधणाऱ्यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. यामध्ये ५७ लोकांकडून ११ हजार ४०० रुपयांची दंडाची वसुली करण्यात आली. तर विनाकरण नागरिकांनी बाहेर पडू नये व कामासाठी बाहेर आल्यास मास्क वापरून सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

अमरावतीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

बँकांनासुध्दा भेटी देऊन गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टीम सुरू करण्याच्या व्यवस्थापकांना सूचना दिल्या गेल्या आहेत. या कारवाईदरम्यान साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांच्याद्वारे मास्क वितरण करण्यात आले. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर त्यांना साहस संस्थेतर्फे मास्क वितरीत करून यापुढे मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

Last Updated : Apr 16, 2020, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.