ETV Bharat / state

मुस्लिमांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने अमरावतीत तणाव

बुधवारी कामगारांचा देशव्यापी संप आहे. त्यामुळे शहरात कामगारांचा भव्य मोर्चा निघणार आहे. याच वेळी मुस्लीम समाजाच्यावतीनेही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोर्चा
मोर्चा
author img

By

Published : Jan 8, 2020, 2:15 PM IST

अमरावती - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अमरावतीमध्ये मुस्लीम समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमरावती शहरामध्ये तणावाचे वातावरण

बुधवारी कामगारांचा देशव्यापी संप आहे. त्यामुळे शहरात कामगारांचा भव्य मोर्चा निघणार आहे. याच वेळी मुस्लीम समुदायाच्यावतीनेही मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मोर्चात सहभागी होण्यासाठी मुस्लीम समुदाय सायन्स कोअर मैदान येथे जमा झाला. सायन्स कोअर मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता.

हेही वाचा - कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू

या मोर्चासाठी अगोदर परवानगी घेतली नाही. शहरात कामगारांचा मोर्चा निघणार असल्याने वेळेवर मोर्चाला परवानगी देता येणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लीम समुदायाच्या नेत्यांना सांगितले.

मोर्चाची परवानगी मिळत नसेल तर आम्हाला तरुंगात टाका, अशी भूमिका मुस्लिमांनी घेतली. सायन्स कोअर मैदानातच शेकडो मुस्लिमांनी जेलभरो आंदोलनाचा नारा देत ठिय्या मांडला. मोर्चासाठी एकत्र आलेल्या मुस्लीम समाजातील अनेकांना पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण घटनेमुळे शहरात काहीसे तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Intro:नागरिक्त्व संशोधन कायद्याविरोधात आज अमरावतीत मुस्लिम समुदायाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नसल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Body:आज कामगारांचा देशव्यापी संप असताना शहरात कामगारांचा भव्य मोर्चा निघणार आहे असे असताना मुस्लिम समुदायाच्या वतीने नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव सायन्स कोअर मैदान येथे एकत्रित आले. नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सायन्स कोअर येथून राजकमल चौक इर्विन चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम बांधवांचा मोर्चा निघणार होता.
मोर्चाची परवानगी घेतली नसल्यामुळे हा मोर्चा आज काढता येणार नाही. शहरात आधीच कामगारांचा मोर्चा निघणार असताना शहराच्या मध्यभागातून मोर्चा काढण्याची परवानगी तुम्हाला आज देऊ शकत नाही असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांशी बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे शहराच्या विविध भागात मोर्चासाठी एकत्र आलेल्या मुस्लिम समाजातील अनेकांना पोलिसांनी अटक केली. आम्हाला मोर्चा ची परवानगी देत नसेल तर आम्हाला जेलमध्ये टाका अशी भूमिका घेत सायन्स कोअर मैदान येथे शेकडो मुस्लिमांनी जेलभरो आंदोलनाचा नारा देत ठिय्या मांडला आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे शहरात काहीसे तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.