अमरावती - तिवसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची आज काँग्रेसच्या प्रतोदपदी निवड करण्यात आली. याआधी त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली होती. तर, मेघालय आणि कर्नाटक या २ राज्याच्या निवडणुकीची जबाबदारीदेखील त्यांच्यावर दिली होती.
यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाच्या विदर्भातील एकमेव महिला आमदार आहेत. काँग्रेस पक्षाने राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाच्या काँग्रेसच्या नेत्या म्हणूनही त्यांची निवड केली आहे. आता यशोमती ठाकूर यांना काँग्रेस पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार आहे. तर त्यांना विविध जबाबदारी त्यांना देण्यात आल्या आहेत.
यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ ग्रामीण आहे. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील जबाबदारी त्यांना दिल्याने यशोमती ठाकूर यांनी पक्षाचे आभार मानले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ठाकूर यांच्या निवडीने तिवसा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.