अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीनंतर आज (गुरुवारी) मतमोजणी होत आहे. यात पहिल्या पसंती क्रमांकाच्या 14 हजार मतांपैकी किरण सरनाईक यांनी 831 मतांनी आघाडी घेतली आहे. किरण सरनाईक, श्रीकांत देशपांडे यांच्या पाठोपाठ शेखर भोयर हे स्पर्धेत आहेत.
पहिल्या पसंती क्रमांकाची मते -
14 हजार मतांमध्ये किरण सरनाईक यांना 3 हजार 131 मते मिळाली आहेत. विद्यमान आमदार यांना 2 हजार 300, आणि शेखर भोयर यांना 2 हजार 78 मते मिळाली आहेत. संगीता शिंदे यांना 1304, भाजपचे डॉ. नितीन धांडे यांना 666, प्रकाश काळबांडे यांना 437, निलेश गावंडे यांना 1183, श्रीराम बॉंकीवले यांना 348, डॉ. अविनाश बोर्डे यांना 1 हजार 1174 मते मिळाले आहेत.
दुसऱ्या फेरीच्या मत मोजणीला सुरुवात -
दुसऱ्या फेरीत पुन्हा 14 टेबलवर प्रत्येकी एक हजार अशा 14 हजार मतांची मोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतांची मोजणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालेल, असा अंदाज आहे.
रात्री उशिरापर्यंत होणार चित्र स्पष्ट -
पहिल्या फेरीत कोणी उमेदवार मतांचा निश्चित कोटा पूर्ण करेल, असे वाटत नसल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया बरीच किचकट असल्याने कोण बाजी मारणार? हे चित्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल.
हेही वाचा - '...अन्यथा त्यांचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही'