ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांकडून धारणी येथील कोरोना परिस्थितीची पाहणी - amravati latest news

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी धारणी येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडून धारणी येथील कोरोना परिस्थितीची पाहणी

author img

By

Published : Oct 2, 2020, 12:42 AM IST

अमरावती - कोरोना प्रतिबंधक उपाययोजनात तपासणी व उपचारासह 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी धारणी दौऱ्यादरम्यान दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी धारणी येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनात उपचारपद्धतीबाबत वेळोवेळी निर्गमित आदेशातील सर्व आदेशांचे काटेकोर पालन व्हावे. डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी चांगली सेवा बजावत आहेत. मात्र, कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांकडूनही स्वयंनियंत्रण व दक्षतेचे पालन आवश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता आदी दक्षता नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. त्यामुळे तपासणी, उपचार व लोकशिक्षणासाठी 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सर्वदूर राबविण्यात येत आहे. मेळघाटातही गावोगाव या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी व सातत्याने जनजागृती करावी, असे निर्देश नवाल यांनी दिले. यावेळी शैलेश नवाल यांनी धारणी येथील वैद्यक यंत्रणा, रुग्णालय, क्वारंटाईन सेंटर व परिसरातील व्यवस्था आदींची पाहणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.