अमरावती : Amravati Crime News: काकाने दोन वर्षीय चिमुकल्या पुतण्याची पायाखाली तुडवून हत्या ( Uncle Killed his Nephew) केल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील पोहराबंदी (Amravati News) येथे घडली आहे.
तो राहायचा वहिनी आणि पुतण्यासोबत : या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी काकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime News ) महिलेचा आरोपीच्या भावासोबत सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना तीन अपत्ये आहेत. त्याच्यात नेहमी वाद होत असल्याने काही महिन्यांपूर्वी महिला ही चिमुकल्या घेऊन माहेरी शिरपूरला निघून गेली होती.
चिमुकल्याला केली मारहाण : आरोपी हा महिलेच्या माहेरी गेला. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला चांगले ठेवेन, असे म्हणून तो तिला पोहराबंदी येथे घेऊन आला. पोहरा बंदी गावात आल्यावर आरोपी हा वहिनी आणि दोन वर्षाच्या पुतण्यासोबत स्वतंत्र राहू राहायचा. काही दिवसातच आरोपी हा चिमुकल्यावरून महिलेसोबत वाद घालायला लागला. एप्रिलमध्ये आरोपीने माहिले सोबत वाद घालून तिच्यासह चिमुकल्याला मारहाण केली होती. त्यावेळी फ्रेजरपुरा ठाण्यात मारहाणीचा गुन्हा (Fraserpura Police Station) देखील दाखल झाला होता. त्यानंतर महिला ही चिमुकल्यासह पुन्हा माहेरी शिरपूरला निघून गेली. दरम्यान, ऑगस्टमध्ये मुलाची प्रकृती बिघडल्याने महिला त्याला घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आली. याबाबत माहिती मिळाल्यावर आरोपी पुन्हा महिलेकडे गेला. त्याने माफी मागून पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर तो तिला आपल्यासोबत गावी पोहराबंदी येथे घेऊन आला.
अशी आहे घटना : काही दिवस चांगला राहिल्यानंतर मंगळवारी रात्री कामावरून घरी परतल्यावर आरोपीने पुन्हा वाद घातला. महिलेस शिवीगाळ करून मारहाणसुद्धा केली. त्याचवेळी मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यावर आरोपीने त्याला पाळण्यातून उचलून खाली फेकले. त्याला पायाखाली तुडवले. त्यात मुलाचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर आरोपीने याबाबत कुणाला काहीही न सांगण्यासाठी महिलेस धमकी दिली. त्यानंतर त्याने गावच्या पोलीस पाटील यांना मुलाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. त्यावर पोलीस पाटील यांनी त्याला बाळाला दवाखान्यात नेण्याचे सूचविले. पण, याबाबत पोलीस पाटील यांच्यासह गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली.
हत्येचा गुन्हा दाखल : पोलिसांनी महिलेसह आरोपीची कसून चौकशी केली. यावेळी महिलेने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा -