ETV Bharat / state

अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या 795 वर; दोन दिवस संचारबंदी

अमरावतीमधील कोरोनाबाधितांची संख्या 795 वर पोहोचली आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

amravati corona update
अमरावती कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 11, 2020, 10:57 AM IST

अमरावती- जिल्ह्यात शुक्रवारी 13 कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे अमरावतीमधील कोरोनाबाधितांची संख्या 795 वर पोहोचली आहे. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार आशा दोन दिवस संचारबंदीची घोषणा केली आहे.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जुनी वस्ती बडनेरा परिसरात 55 वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष आणि बडनेरा नवी वस्ती येथील पावन नगर परिसरात 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तारखेडा परिसरात 23 वर्षीय पुरुष, शेगाव नाका परिसरात 17 वर्षीय युवती, भीमनगर परिसरात 50 वर्षीय महिला, अरुण कॉलनी येथे 57 वर्षीय पुरुष, सरस्वती नगर येथे 47 वर्षीय पुरुष, यशोदा नगर परिसरात 28 वर्षीय महिला, संजय गांधी नगर येथे 34 वर्षीय पुरुष तसेच तिवसा येथील आझाद नगर परिसरात 40 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष आणि मताखिडकी परिसरात 30 वर्षीय पुरुषाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

अमरावती शहरातील सर्वच भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोना पसरला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावला आटोक्यात आणण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने जिल्हा प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.