अमरावती - सध्या खरिप हंगामातील पिकांना युरिया देण्याचे काम शेतकरी करत आहेत. शासनाच्या अनुदानावर शेतकऱ्यांना युरिया दिला जातो. पण, कृषी विभाग आणि कृषी संचालक यांच्या लागेबांधीमुळे मात्र शेतकऱ्यांना युरीया मिळत नसून त्याचा काळा बाजार करून कृत्रीम टंचाई ही दाखवल्या जाते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या शेतकरी आपल्या शेतातील पिकांना युरियासह अन्य खत देत आहे. पण, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युरियाची कृत्रीम टंचाई ही होत असते. पण, ही टंचाई पाडण्यामागेही अनेकांचे हात असतात. असाच एक प्रकार अमरावती पासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णानगर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील शेतकरी उमेश महिंगे यांनी काही दिवसांपूर्वी एका कृषी केंद्रातून चार बॅग युरियाच्या खरेदी केल्या होत्या. त्यांना कृषी केंद्र संचालकाने बिलही चार बॅगचेच दिले. पण, ऑनलाइन पद्धतीने दुकानदराने रजिस्ट्रेशन मात्र सहा बॅगचे दाखवून दोन बॅग स्वतःकडेच ठेऊन मग त्याचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप उमेश महिंगे या शेतकऱ्यांने केला आहे.
अशी परिस्थिती एकट्या या शेतकऱ्यांची नाही तर परिसरातील असे अनेक शेतकरी आहे. ज्यांना असा अनुभव आला आहे. कृषी संचालंकाकडून शेतकऱ्यांना बिल वेगळे आणि रजिस्ट्रेशन वेगळे करून त्यांच्या नावे जास्त बॅग खरेदी केल्याचे दाखवून उर्वरित बॅगचा काळाबाजार करून त्या चढ्या दराने विकण्याचा गोरख धंदा हा सर्रास सुरू असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवला तर दुकानदार शेतकऱ्यांची उधारी बंद करू शकतो या भीतीने बोलत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यात काळाबाजार करणारे हजारो कृषी केंद्राचे दुकाने आहे. पण, कृषी विभागाच्या साटेलोट्यामुळे या कृषी संचालकांना अभय मिळते असल्याने त्यांना आता कारवाईची भीती राजहली नसक्याचे शेतकऱ्यांच म्हणणे आहे. दरम्यान, अशा प्रकारे जर युरियाचा काळाबाजार कोणी करत असेल तर त्यांच्यावर कृषी विभागाकडून कारवाई करण्यात येइल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांनी दिली आहे.
काही शेतकऱ्यांनी सांगितले की आम्ही सकाळी दुकानात युरिया खरेदी करायला जातो तेव्हा दुकानदार युरिया नसल्याचे आम्हाला सांगतात. पण, रात्री काही शेतकऱ्यांना हेच दुकानदार युरिया पुरवत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नाही कारण यंदा तीन हजार मेट्रिक टन आपल्याकडे युरिया आला होता. त्यापैकी 2 हजार 200 हा साठा वाटण्यात आला आहे. उर्वरित साठा हा टंचाई होऊ नये म्हणून आपण शिल्लक ठेवला असल्याच कृषी अधीक्षकांनी संगीतले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कृषी संचालक यांच्याशी बोलून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी कुठली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - चिखलदऱ्याच्या चिचाटी धबधब्यावर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी