ETV Bharat / state

अमरावतीत कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकरी करणार घरच्याच सोयाबीन बियाण्याचा वापर

कृषी विभागाच्या समन्वयाने बहुसंख्य शेतकरी घरच्याच सोयाबीन बियाण्याचा वापर करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक दाखवले जातेय. बहुसंख्य शेतकरी स्वतःच आपल्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासून घेत आहेत. ही क्षमता 65% पेक्षा जास्त आहे, अशा सोयाबीनला गावामध्ये भरपूर मागणी आहे.

author img

By

Published : Jun 5, 2020, 10:57 AM IST

शेतकरी करणार घरच्याच सोयाबीन बियाण्याचा वापर

अमरावती - दरवर्षी घरचे पेरणीलायक सोयाबीन बियाणे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी वापरावे, यावर कृषी विभागाचा भर असतो. परंतु, शेतकरी महागड्या बियाण्याच्या कंपनीच्या बॅगांवर जास्त विश्वास ठेवतात. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली आहे. मागच्या खरीप हंगामात पावसामुळे 80% पर्यंत खराब झालेले सोयाबीन व कंपन्यांनी आकारलेले जादा दर यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता ते गावामध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला प्राधान्य देत आहे. गावामध्ये JS-335, 9305, MAUS-158 या जातींचे सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. बियाण्यासाठी हे सोयाबीन उपयोगात आणताना सर्वप्रथम त्याची उगवणक्षमता किती आहे, हे पाहणे अतिशय आवश्यक असते.

अमरावतीत कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकरी करणार घरच्याच सोयाबीन बियाण्याचा वापर
या बियाण्याची उगवणक्षमता तपासणीची जबाबदारी चांदूर रेल्वे येथील कृषी विभागाने उचलली आहे. कृषी सहाय्यक गावात चांगल्या प्रतीचे सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना बियाणे उगवणक्षमता तपासणीचे महत्त्व समजावून त्यांना जागेवरच प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. बहुसंख्य शेतकरी स्वतःच आपल्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासून घेत आहेत. ज्या सोयाबीनची उगवण क्षमता 65% पेक्षा जास्त आहे, अशा सोयाबीनला गावामध्ये भरपूर मागणी आहे. गावातील सोयाबीन बियाणे विकणारा शेतकरी चाळणी मारून चांगल्या प्रतीचे बियाणे देण्यावर भर देत आहेत. बियाणे खरेदी करणारा शेतकरी त्याला योग्य भाव देऊन प्रतिसाद देत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना गावातल्या गावातच खात्रीपूर्वक सोयाबीन बियाणे उपलब्ध होत आहे. शासकीय विभागाने एखादे चांगले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि त्याला शेतकरी बांधवांनी योग्य साथ दिली तर असे चांगले परिणाम पहावयास मिळतात. कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकरी घरच्या सोयाबीन बियाण्याचा वापर करीत असले तरी या बियाण्याला बुरशीनाशकांची व जीवाणू संवर्धकांची अवश्य बीजप्रक्रिया करावी असे जाहीर आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.