अमरावती : खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यरीकरण करण्यासाठी आपल्या निधीमधून ५० लाख रुपये आणि आपल्या पगारातून १० लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आम्हाला अशा जात चोर खासदाराचा निधी नकोच आहे, अशी आग्रही आणि टोकाची भूमिका (Ambedkar activists aggressive against MP Navnit Rana) पुतळा सौंदर्यकरण समितीने घेतली आहे.
सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळेच जोपर्यंत ती जागा समितीकडे हस्तांतरित होत नाही तोपर्यंत तो निधी खर्च न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुरक्षित ठेवावा, अशी मागणी पुतळा सौंदर्यीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केली असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. निधी जरी पवित्र असला तरी देणारी व्यक्तिमत्व पवित्र रस्त्याची भावना एवढी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अमरावतीत पत्रपरिषद : अमरावतीत घेतलेल्या या पत्र परिषदेला ऍड. पी एस खडसे, किशोर बोरकर, ऍड. दिलीप एडतकर, प्रा. सतिश सियाले, जगदीश गोवर्धन, किरण गुडधे, प्रा. विनायक दुधे, मराठा महासंघाचे भैयासाहेब निचड, सुनील रामटेके, हरिदास शिरसाट, राजा चौधरी, वर्षा आकोडे ,शीतल गजभिये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.