ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महिला पालकमंत्र्यांचा अवमान! शहर काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रार - शहर काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

महापालिकेत कुठल्याही स्वरूपाची परवानगी न घेता स्थापन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनानेही अंधारातच ( Chatrapati Shivaji Statue controversy ) काढला. त्या संपूर्ण प्रकारानंतर अमरावती शहरात वेठीस धरण्याचा प्रकार घडला. शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी पोलिसांनी शांतता भंग करणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत ( Amaravati Shahar congress president Babalu Shaikh ) यांनी केली आहे..

शहर काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
शहर काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
author img

By

Published : Jan 18, 2022, 7:06 PM IST

Updated : Jan 18, 2022, 9:34 PM IST

अमरावती- छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आज जिल्ह्याच्या महिला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळा जाळण्यात ( Yashomat Thakurs statue set fire ) आला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा अवमान केल्याचा प्रकार घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन असे चुकीचे कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आज शहर काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

शहरात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी
गत चार-पाच दिवसांपासून अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करून अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे. काही लोकांनी रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर स्थापन केला. महापालिकेत कुठल्याही स्वरूपाची परवानगी न घेता स्थापन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनानेही अंधारातच ( Chatrapati Shivaji Statue controversy ) काढला. त्या संपूर्ण प्रकारानंतर अमरावती शहरात वेठीस धरण्याचा प्रकार घडला. शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी पोलिसांनी शांतता भंग करणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत ( Amaravati Shahar congress president Babalu Shaikh ) यांनी केली आहे.

शहर काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

हेही वाचा-Remove Chhatrapati Statue In Daryapur : पुतळ्यावरुन राजकारण तापले, दर्यापुर शहरात तणावाचे वातावरण

संबंध नसतानाही पालकमंत्र्यांचा विरोध खपवून घेतला जाणार नाही
गेली पाच दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावती शहरात गोंधळ सुरू आहे. त्याचा आम्ही निषेध नोंदवितो. खरेतर राजा उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी तीन वर्षांपासून परवानगी घेण्यात आली असल्याचे युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने सांगण्यात येत आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव महापालिकेच्या आमसभेत आलेला नाही. केवळ शहरातील वातावरण बिघडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप बबलू शेखावत यांनी केला.

हेही वाचा-Yashomati Thakur on Corona Rules : कोरोनाचे नियम पाळा, लस घ्या; आढावा बैठकीत मंत्री यशोमती ठाकुरांचे आवाहन

निवेदन देताना या काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती
शहरातील शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी यासंदर्भात शहर काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह माजी महापौर मिलिंद चिमोटे ( Ex mayor Milind Chimote ) आणि विलास इंगोले तसेच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष किशोर बोरकर, दिलीप एडतकर, राजा बांगडे, निलेश गुहे, संकेत कुलट, संदेश जैन आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा-'शाहिस्तेखानाची बोटही महाराष्ट्रात छाटली गेली होती; त्यामुळे तुमचा..'; पटोलेंवर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली

Last Updated : Jan 18, 2022, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.