ETV Bharat / state

परदेशी सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक करणारे दोघे ताब्यात

author img

By

Published : Oct 23, 2020, 12:29 PM IST

थायलंड, बँकॉक सहलींच्या नावावर पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना अंजनगाव पोलिसांनी अटक केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील डॉ. नंदकिशोर अरुण पाटील (वय 30) व विनोद अरुण पाटील (32) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

Two arrested for cheating tourists
पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

अमरावती - थायलंड, बँकॉक या सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या दोन भावांना अंजनगाव पोलिसांनी अटक केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील डॉ. नंदकिशोर अरुण पाटील (वय 30) व विनोद अरुण पाटील (32) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी दिनांक 16 जून 2019 रोजी विदेशातील सहलीचे आयोजन केले होते. मानव सेवा विकास फाउंडेशन या संस्थेमार्फत आकर्षक जाहिराती, पत्रक छापून त्यांनी या सहलीचे आयोजन केले. त्यांतर प्रतिव्यक्ती चाळीस हजार रुपये प्रमाणे एकूण 41 पर्यटकांचे पैसे स्वतःच्या अकाउंटला जमा केले. ठरलेल्या तारखेप्रमाणे एकूण 41 पर्यटक विदेशातील सहली करता मुंबई विमानतळावर जमा झाले.

ठाणेदार राजेश राठोड

मात्र, सहल आयोजित करणारे डॉ. नंदकिशोर अरुण पाटील, व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील हे दोघेही विमानतळावर उपस्थित नसल्याने पर्यटकांमध्ये शंका निर्माण झाली. पर्यटकांनी लगेच नंदकिशोर पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यांनी पर्यटकांचे कॉल रिसिव्ह न करता सदर सहल काही तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचे व आपले पैसे आठ दिवसात परत करण्याचे मेसेज पाठवले. परंतु पर्यटकांचे कोणतेही पैसे आजपर्यंत परत न मिळाल्याने अखेर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एक पर्यटक राजू सिंग धनसिंग जाधव यांनी 21 ऑक्टोबर 2020 रोजी सदर व्यक्तीविरुद्ध अंजनगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

विदेशातील सहलीच्या आयोजनाखाली फसवणूक करणारा, व विमानाची बनावट तिकीट तयार करणारा नंदकिशोर अरुण पाटील, विनोद अरुण पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, अंजनगाव सुर्जी न्यायालयाने दिनांक 27 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.