ETV Bharat / state

अमरावतीमध्ये पाचही मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा, सर्वस्तरांतून कौतुक - वडिलांच्या पार्थिवाला खांदा अमरावती मोर्शी

गंगाधर काळमेघ यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांना पाचही मुली आहेत. मात्र, आपल्याला मुलगा नाही याची खंत त्यांनी कधीही वाटू दिली नाही. गंगाधर काळमेघ हे नोकरीच्या निमित्ताने 30 ते 35 वर्षे नागपूर येथे वास्तव्यास होते. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मोर्शी येथील समर्थ कॉलनी येथे वास्तव्याला होते. त्यांनी आपल्या पाचही मुलींचे मुलाप्रमाणे पालन-पोषण करून उच्चशिक्षित केले. त्यांच्या पाचही मुलीचे लग्न झाले आहे आणि त्या आपापल्या सासरी नांदत आहेत.

अमरावतीमध्ये पाचही मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा
author img

By

Published : Sep 28, 2019, 1:24 PM IST

अमरावती - 'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव गुरुवारी अमरावतीच्या मोर्शीकरांना आला. घरात वंशाचा दिवा नाही म्हणून घरातील पाचही मुलींनी आपल्या वडिलांना खांदा देऊन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. तर पाचही मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याची वार्ता मोर्शी शहरात कळताच, सर्वस्तरातून मुलींचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - ईडीने पवारांना नोटीस दिलीच नव्हती; अर्थमंत्री मुनगंटीवारांचा खुलासा

गंगाधर काळमेघ यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांना पाचही मुली आहेत. मात्र, आपल्याला मुलगा नाही याची खंत त्यांनी कधीही वाटू दिली नाही. गंगाधर काळमेघ हे नोकरीच्या निमित्ताने 30 ते 35 वर्षे नागपूर येथे वास्तव्यास होते. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मोर्शी येथील समर्थ कॉलनी येथे वास्तव्याला होते. त्यांनी आपल्या पाचही मुलींचे मुलाप्रमाणे पालन-पोषण करून उच्चशिक्षित केले. त्यांच्या पाचही मुलीचे लग्न झाले आहे आणि त्या आपापल्या सासरी नांदत आहेत.

हेही वाचा - माझ्यासोबत दादांची चर्चा झाली, राजकारणातून संन्यास घेणार नाहीत - पार्थ पवार

आपण आजारी झाल्यानंतर आपली सेवा पाचही मुलीने आपल्याच स्तरावर केली. मात्र, आपल्या वडिलांनी मुलगा नसल्याची खंत कधीही वाटू दिली नाही. आईकडून वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, सासरी असलेल्या मुली सुनिता प्रदीप कोहळे (ब्रह्मपुरी), जयश्री निलेश खोडे (आर्वी), भारती अजय ठाकरे (मोर्शी), नलिनी राजेश चोपडे (नागपूर), कीर्ती अमित बनकर (नागपूर) यांनी जावयांसह मोर्शी येथे पोहोचून अंत्यसंस्काराची तयारी चालू केली आणि मुलगा हाच वंशाचा दिवा आहे. ही प्रथा मोडीत काढून चार मुलीने वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला तर एका मुलीने आपटे धरले. दुर्गवाडा येथील स्मशानभूमीत अंतयात्रा पोहोचल्यावर मुलीने त्यांच्या चितेला भडाग्नी दिला. या सर्व प्रकाराचे परिसरात कौतुक होत आहे.

Intro:पाच मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

अमरावती अँकर
'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देतो दोन्ही घरी ' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव गुरुवारी अमरावतीच्या मोर्शीकराना आला . घरात वंशाचा दिवा नाही म्हणून घरातील पाच ही मुलींनी आपल्या वडिलांना खांदा देऊन एक नवीन आदर्श निर्माण केला .
, येथील समर्थ कॉलनी परिसरात गंगाधर काळमेघ यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते . त्यांना पाचही मुली असल्याने आपल्याला मुलगा नाही याची खंत कधीही वाटू दिली नाही . गंगाधर काळमेघ तीस ते पस्तीस वर्षे नोकरी दरम्यान आपलं आयुष्य नागपूर येथे काढले होते. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मोर्शी येथिल समर्थ कॉलनी येथे वास्तव्याला होते . आपल्या पाचही मुलीचे मुलाप्रमाणे पालन-पोषण करून उच्चशिक्षित केले. त्यांच्या पाचही मुलीचे लग्न झाले असून त्या आपापल्या सासरी नांदत आहे. आपण आजारी झाल्यानंतर आपली सेवा पाचही मुलीने आपल्याच स्तरावर केली . आपल्या वडिलाला मुलगा नसल्याची खंत कधीही वाटू दिली नाही. आई कडून वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सासरी असलेल्या मुली . सुनिता प्रदीप कोहळे राहणार ब्रह्मपुरी, जयश्री निलेश खोडे राहणार आर्वी , भारती अजय ठाकरे राहणार मोर्शी, नलिनी राजेश चोपडे राहणार नागपूर, कीर्ती अमित बनकर राहणार नागपूर जवाई सह मोर्शी येथे पोहोचून अंत्यसंस्काराची तयारी चालू केली . मुलगा हाच वंशाचा दिवा आहे ही प्रथा मोडीत काढून चार मुलीने वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला तर एका मुलीने आपटे धरले. दुर्गवाडा येथील स्मशानभूमीत अंतयात्रा पोहोचल्यावर मुलीने त्यांच्या चितेला भडाग्नी दिली.
पाचही मुलीने वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याची वार्ता मोर्शी शहरात कळताच सर्वस्तरातून सदर मुलींचे कौतुक केले जात आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.