ETV Bharat / state

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा मानस - अजित पवार - ग्लोबल वॉर्मिंग

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचा मानस अजित पवारांनी व्यक्त केला आहे. ते आज अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर क्रेडाईतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो समारंभात बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 3:58 PM IST

अजित पवार यांचं भाषण

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करायची आहे. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. देशाच्या एकूण पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेपैकी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा मानस आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. ते अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर क्रेडाईतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो समारंभात बोलत होते. राज्याचं आर्थिक चक्र नीट चालू ठेवायचं असेल, तर बांधकाम क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

वाळू ऐवजी क्रश सैंडचा वापर : आज अमरावतीसह राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना वाळूची समस्या भेडसावत आहे. त्यामुळं राज्यभरातील बांधकाम व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळात वाळूप्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र, पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे, असं पवार म्हणाले. तसंच ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करता वाळूऐवजी क्रश सँड वापरायला हवी, असं देखील त्यांनी सांगितलं. क्रेडाई प्रमुख सतीश मगर यांनी 450 एकरचं पहिलं मगरपट्टा शहर संपूर्णपणं क्रशनं बांधलं आहं. घराचं प्लॅस्टरही क्रशनं केलंय. पुण्यातील नांदेड सिटीतील 750 एकरांवर काम क्रशमध्ये सुरू आहे. त्यामुळं अमरावतीसह संपूर्ण राज्यातील बांधकाम व्यावसायिकांनी आता वाळूऐवजी क्रशचा वापर करावा, असंही अवाहन अजित पवार यांनी केलंय.

नागपूर पेक्षा अमरावतीत जमिनीचे दर अधिक : नागपूरपेक्षा अमरावती शहरातील जमिनीचे दर जास्त असल्याचे समजताच अजित पवार यांना आश्चर्याचा धक्का बसला. अमरावतीत कोणी लँड बँकिंग तर केली नाही ना?, असा सवाल अजित पवार यांनी केला. अमरावती शहराचा विस्तार होत असताना अजूनही शहरात भूमिगत गटाराचं काम पूर्ण झालं नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी सोमवारी नागपुरात येऊन त्यांना यासंदर्भात काय अडचणी आहेत, याची माहिती द्यावी, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी अमरावतीतील बांधकाम व्यावसायिकांना सोमवारी नागपुरात येऊन क्रेडाईसंदर्भातील समस्यांबाबत भेट घेण्यास देखील सांगितलं.

हेही वाचा -

  1. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थकारणावर परिणाम होणारी कोणती विधेयकं मंजूर झाले? जाणून घ्या सविस्तर
  2. पंतप्रधान मोदी जागतिक पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय नेते- कन्सल्टिंग कंपनीचा सर्वेक्षणातून दावा
  3. कुठे काय मुरलं? भाजपाच्या नैतिकतेचं ऑडिट व्हायला हवं- खासदार संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.