ETV Bharat / state

..तरीही वरूड तालुक्यात 0 टक्के नुकसान; कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल

author img

By

Published : Dec 7, 2019, 9:05 AM IST

कृषी विभागाच्या नुकसाना अहवालात वरूड तालुक्यात ० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

amravti
नुकसान झालेले शेत

अमरावती- ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडला होता. यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सुमारे ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे वरूड तालुक्यामध्येही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाच्या नुकसान अहवालात वरूड तालुक्याला डावलल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र भुयार

ओक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून नुकसान अहवाला काढण्यात आला आहे. मात्र, त्यात वरूड तालुक्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा पिकाची गळ व कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असताना सुद्धा कृषी विभागाच्या अहवालात वरूड तालुक्यात ० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.

दरम्यान, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची ही शेखचिल्लीची प्रवृत्ती असल्याचा गंभीर आरोप वरूड-मोर्शीचे नवनियुक्त आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. हे जाणीवपूर्वक केले असून तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू नये यासाठी जर कृषी अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली येऊन हे पाऊल उचलले असेल, तर कृषी अधिकाऱ्यांचा कान धरून त्याला शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आम्ही घेऊन येऊ, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

हेही वाचा- गाजावाजा करीत लावलेले वृक्ष जगतील कसे? आराड-कुराड जंगलात पाण्याविनाच रोपटे

Intro::-माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंच्या वरुड तालुक्यात शून्य टक्के नुकसान झाल्याचा धक्कादायक अहवाल

अमरावती अँकर
मागील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सह जोरदार पाऊस झाल्याने अमरावती जिल्ह्यातील 14 ही तालुक्यांमध्ये सुमारे 3 लाख 73 हजार 550 हेक्टर नुकसान झाले आहे. मात्र, वरुड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडणारी
धक्कादायक माहिती कृषी विभागाच्या नुकसानिच्या अहवालातून समोर आली आहे.या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा पिकाची गळ व कापूस ,सोयाबिन चे मोठे नुकसान झाले असताना सुद्धा. या तालुक्यामध्ये 0 टक्के नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.दरम्यान माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची ही शेखचिल्लीची प्रवृत्ती असल्याचा गंभीर आरोप वरुड-मोर्शीचे नवनियुक्त आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वरुड तालुक्यामध्ये नुकसान भरपाई मिळू नये यासाठी जर कृषी अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली येऊन हे पाऊल उचलले असेल तर कृषी अधिकाऱ्याचा कान धरून त्याला शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आम्ही घेऊन येऊ असेही आमदार देवेंद्र भुयार यांनी बोलताना सांगितले.

बाईट:- देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी,अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.