ETV Bharat / state

अमरावतीत मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच, जन्मदात्रीनेही सोडले प्राण - सावरखेडा

मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईला याचा धक्का सहन झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटनाअमरावतीतील सावरखेडा गावात घडली आहे.

गजानन खोडे आणि त्यांची आई
author img

By

Published : Jun 2, 2019, 12:24 PM IST

अमरावती - मुलाच्या मृत्यूच्या बातमीचा धक्का सहन झाल्याने जन्मदात्या आईने मुलाच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. कमलाबाई, असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. ही घटना अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावात घडली.

सावरखेड ग्रामपंचायत

सावरखेडा गावचे सरपंच गजानन खोडे (४५) हे गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना अमरावतीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, शनिवारी त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या अकाली मृत्यूची बातमी त्यांची आई कमलाबाईला कळताच त्यांना धक्का बसला. ज्या मुलाला लहानाचे मोठे होताना पाहले. त्याचाच मृतदेह पाहण्याची वेळ या माऊलींवर आली होती. याच धक्क्यातून तिनेही अखेरचा श्वास घेतला.

आई-मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे खोडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी मुलगा आणि आईवर एकाच ठिकाणी एकाच वेळेस अंत्यसंस्कार करण्यात आले.

Intro:पोटच्या गोळ्याच्या मृत्यूची बातमी कळताच, जन्मदात्या माऊलीनेही घेतला अखेरचा श्वास .

एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

अमरावतीच्या सावरखेड गावातील एकमेकांवर जीव ओतणाऱ्या आई मुलाच्या प्रेमाची साक्ष देणारी घटना

-----------------------------------------------

  अमरावती अँकर

नऊ महिने उदरात ठेऊन ज्याला जन्म दिला ,लहाण्याचे मोठे केले,वेळप्रसंगी स्वतःहा दुःख पेलून त्याच्या सुखासाठी  याचना केली.त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ,त्याचे प्रत्येक लाड पुरवले,बघता बघता तो मोठा झाला आणि कुटुंबाचा कर्ता पुरुष बनला परन्तु याच घरातील कर्त्या पुरुषाचा आजाराने मृत्यू झाल्याचे बातमी त्या जन्मदात्या माऊलीला कळली अन् तिनेही जगाचा निरोप घेतला .ही दुर्दैवी घटना घडली अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावात या गावातील सरपंच गजानन खोडे हे गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते .अशातच काल त्यांचा अचानक मृत्यू झाला. पोटच्या गोळ्याच्या म्रुत्युची बातमी कळताच आई कमलाबाईनेही अखेरचा श्वास घेतल्याने खोडे कुटुंबातील एकाच दिवशी माय लेकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावतीच्या सावरखेड येथील 45  वर्षीय गजानन खोडे काही दिवसा पासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते .त्यासाठी अमरावती मधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.परन्तु काल त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या या अकाली  म्रुत्युची बातमी त्यांची आई कमलाबाई ला कळताच त्यांना धक्का बसला. ज्या मुलाला लहाण्याचे मोठे होताना पाहले.त्याचाच मृतदेह पाहण्याची वेळ या माऊलींवर आली होती.आणि याच धक्क्यातून तिनेही अखेरचा श्वास घेतला.सावरखेड गावात ही घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.काल मुलगा आणि आई वर एकाच ठिकाणी एकाच वेळेस अंत्यसंस्कार करण्यात आलेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.