ETV Bharat / state

ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन - shivrajyabhishek sohala 2021

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. त्यांनी 350 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या लोक कल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी यावेळी केले.

ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन

author img

By

Published : Jun 6, 2021, 5:15 PM IST

अमरावती - युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येऊन नमन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस हा सर्वात मंगलमय दिवस आहे, असे सांगून त्या निमित्त पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचे लोक कल्याणकारी राज्य जगासाठी आदर्श
६ जून १६७४ या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि राजे 'छत्रपती' झाले. आजच्याच शुभ दिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शिवाजी महाराज हे राष्ट्र निर्माते
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. त्यांनी 350 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या लोक कल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी यावेळी केले.

स्वराज्य गुढीचे पूजन
शिवरायांनी कृषी विकास, जलसिंचन, पर्यावरण संवर्धन, लोक कल्याणकारी प्रशासन, उद्यमशीलता अशा विविध बाबतीत विकासाचा परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण केला. महाराजांनी जलसंवर्धन, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध दृष्टिकोनातून एक खऱ्या अर्थाने आधुनिक राज्य स्थापन केले. या मंगलमय दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात स्वराज्यगुढी पूजनाबरोबरच यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्याच्या मंगल सुरांनी आसमंत निनादून गेले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.