अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठातील विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुरुवारी (दि. 24 डिसें.) प्रवेशाची पहिली फेरी घेण्यात आली. कोरोनामुळे 6 महिने उशिराने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून बऱ्याच दिवसानंतर प्रवेशाच्या निमित्ताने विद्यापीठात विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. विद्यपीठातील विद्यार्थी विभागात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.
12 विभाग 30 जागा
विद्यापीठात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सुष्मजीवशास्त्र, संगणक विज्ञान, भूगर्भशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी या 12 विषयांचा स्वतंत्र विभागात प्रत्येकी 30 जागा आहेत. या सर्व मिळून 360 जागांसाठी एकूण 500 विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.
200 रुपये प्रवेश शुल्क
अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात या अभ्यासक्रमासाठी 20 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असताना विद्यापीठात मात्र याच अभ्यासक्रमासाठी केवळ 200 रुपये शुल्क आकारण्यात येते. विशेष म्हणजे विद्यापीठात नियमित शिकवले जाते.
पाचही जिल्ह्यातून आले विद्यार्थी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाशी संलग्नित असणाऱ्या अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यपीठात प्रवेश मिळावा यासाठी आले होते. सकाळी 11 वाजल्यापासून प्रवेशफेरीला सुरुवात झाली आणि सायंकाळी 5 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.
हेही वाचा - शेतकऱ्यांनो, मरू नका.. लढा आणि मारा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा सल्ला
हेही वाचा - दर्यापुरात दागिन्याच्या दुकानावर चोरट्याचा डल्ला; ७५० ग्राम सोने असलेली बॅग लंपास