ETV Bharat / state

अमरावतीत टाटा पीकअप आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; क्लिनरसह १० गोवंशाचा मृत्यू - अमरावती अपघात बातमी

सकाळच्या सुमारास टाटा पीकअप गाडी गोवंश घेऊन अमरावतीकडे येत होती. त्याच वेळी पुण्याहून रहाटगावमार्गे नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडकली. हा अपघात इतका भीषण होता, की यात पीककपमधील क्लिनरसह ८ गायी आणि २ बैलांचा जागीच मृत्यू झाला.

accident between tata pickup and travels in amravati
अमरावतीत टाटा पीकअप आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; क्लिनरसह १० गोवंशाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 20, 2021, 7:42 PM IST

अमरावती - राष्ट्रीय महामार्ग 6 वरील अमरावती शहरानजीक असलेल्या रहाटगाव टी पॉइंटवर आज सकाळच्या सुमारास टाटा पीकअप व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पीकअप वाहनाच्या क्लिनरला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पीकअप वाहनातील १० गोवंशाचादेखील यात मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. संगम मोहोड आणि सलीम खान अकबर खान असे वाहनचालकांचे नाव आहे. तर नासिर अहमद शेख निसार असे मृत्यू झालेल्या क्लिनरचे नाव आहे.

रिपोर्ट

जखमींना उपचारासाठी केले दाखल -

सकाळच्या सुमारास टाटा पीकअप गाडी गोवंश घेऊन अमरावतीकडे येत होती. त्याच वेळी पुण्याहून रहाटगावमार्गे नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडकली. हा अपघात इतका भीषण होता, की यात पीककपमधील क्लिनरसह ८ गायी आणि २ बैलांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय ट्रॅव्हल्समधील २ प्रवासीदेखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - भाजपाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.