ETV Bharat / state

...तर नगरपरिषद कार्यालयाला टाळे ठोकणार, आम आदमी पक्षाचा इशारा - अमरावती राजकीय बातमी

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना सहा महिने उलटूनही अद्याप दुसरा धनादेश मिळालेला नाही. यामुळे त्रस्त लाभार्थ्यांसह आम आदमी पक्षाने चांदूर रेल्वे नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला.

निवेदन देतानानिवेदन देताना
निवेदन देताना
author img

By

Published : Dec 17, 2020, 6:21 PM IST

Updated : Dec 17, 2020, 10:29 PM IST

अमरावती - सहा ते सात महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा दुसऱ्या टप्प्यातील निधी अद्यापही मिळालेला नसून यामुळे त्रस्त लाभार्थ्यांना घेऊन आम आदमी पक्षाने चांदूर रेल्वे नगर परिषदेवर गुरुवारी (दि. 17 डिसें.) धडक मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत धनादेशाचा प्रश्न मार्गी न लागल्यास नगर परिषद कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन देण्यात आला.

आंदोलक

200 कुटूंबाचे घरकुल मंजूर

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत सुमारे दोनशे घरकुले मंजूर झाले आहेत. त्यापैकी काहींना सहा ते सात महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यातील धनादेश मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच लाभार्थ्यांनी आपले बांधकाम सुरू केले. त्याची प्रशासकीय माहिती ही वेळेवर नगरपरिषदेला दिली.

सहा महिने उलटूनही धनादेश वाटप नाही

सहा-सात महिने उलटूनही दुसऱ्या टप्प्यातील धनादेश अद्यापही मिळाला नाही. तसेच काही घरकुल संदर्भात त्रुटीत असलेली प्रकरणे आहेत. या त्रुटी प्रशासनाने दूर करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - अमरावतीत ऑनलाईन शस्त्र खरेदीला प्रतिबंध; पोलीस आयुक्तांकडून आदेश जारी

हेही वाचा - बडनेरा रेल्वेस्थानकावर भटकणाऱ्या मुलांना मिळणार दिशा; 24 तास रेल्वे चाईल्डलाईन सेवा

Last Updated : Dec 17, 2020, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.