अमरावती- आईसमोर मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी या गावात घडली आहे. करण महादेव बेले (वय २२) असे मृत मुलाचे नाव आहे.
करण हा आज त्याची आई व दोन शेतमजूर महिलांसोबत त्याच्या शेतात शेतकाम करायला गेला होता. दरम्यान, शेतातील मजूर व आईसाठी पाणी आणायला तो शेजारच्या शेतातील विहिरी जवळ गेला. येथे तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला.
पाणी आणायला गेलेला करण अद्यापही परतला नासल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. दरम्यान करण हा विहिरीत बुडत असल्याचे त्याच्या आईला दिसून आले. यावेळी करणच्या आईने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, करणला वाचवण्यात यश आले नाही व त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत करणचा मृतदेह विहिरी बाहेर काढला व त्यास शवविच्छेदनासाठी पाठवले.
हेही वाचा- अमरावतीकरांना पवार (नॉनव्हेज), फडणवीस (व्हेज) थाळीचा लागलाय नाद..