ETV Bharat / state

चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीतून भरघोस उत्पादन; पारंपरिक पिकांना फाटा देत नव्या शेतीकडे तरुणाची वाटचाल

चिखलदऱ्यात एका उच्चशिक्षीत तरुणाने पारंपारिक शेतीला बगल देत स्ट्रॉबेरी शेती करण्यास सुरुवात केली. या शेतीला आता ७ वर्ष झाले असून यातून भरघोस उत्पादन आणि चांगला नफा मिळत आहे. चिखलदऱ्यामध्ये अशा प्रकारच्या शेतीसाठी शासनाने अनुदान आणि विमा द्यावा. जेणेकरून मेळघाटातील अनेक तरुण स्ट्रॉबेरी शेती करण्यासाठी पुढे येतील असे या तरुण शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

author img

By

Published : Jan 6, 2020, 2:48 PM IST

Updated : Jan 6, 2020, 3:41 PM IST

amravati
स्ट्रॉबेरी शेती

अमरावती - कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्या, नापिकी यामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या मेळघाटमध्ये आता प्रगतीशील शेतीची नांदी सुरू झाली आहे. पारंपरिक पिकांना रामराम ठोकून एका उच्चशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी शेती करायचा विचार केला आणि तो विचार कृतीत उतरवत यशस्वी शेतीकडे वाटचाल सुरू केली. चिखलदऱ्याजवळील मोथा या गावातील रमेश पाटीलने ७ वर्षांपूर्वी ही स्ट्रॉबेरी शेती सुरू केली होती आणि आज त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.

चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीतून भरघोस उत्पादन

अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा पासून ५ किमी अंतरावर असलेले मोथा हे गाव. या गावातील लोकांचे उत्पादनाचे साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय. मात्र, दुधाला सध्या पाहिजे तेवढा भाव नाही. अनेक शेतकरी येथे पारंपरिक शेती करतात. उच्चशिक्षित असलेले रमेश हे पारंपरिक शेती करायचे. मात्र, चिखलदऱ्यात नेहमी पाऊस जास्त पडतो. त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते. दरम्यान, रमेशने चिखलदराच्या थंड वातावरणाला पोषक असलेल्या स्ट्रॉबेरी शेतीची लागवड करायचा विचार केला. त्यांच्या या उपक्रमाला घरच्यांचीही साथ मिळाली.

रमेशने पहिले जमिनीचे सपाटीकरण करून, ५ फूट अंतरावर समांतर गादी वाफे तयार केले. त्यावर महाबळेश्वर येथून आणलेली स्ट्रॉबेरीची रोपे समान अंतरावर लावली. ड्रीपद्वारे पाणी देऊन मशागत केली आणि बघता बघता स्ट्रॉबेरीची बाग फुलली. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता घरी असलेल्या गुरांचे शेणखत वापरले. स्ट्रॉबेरीचे पीक हे ६ महिन्यांचे असते. रमेशने यावर्षीसुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड केली असून आता स्ट्रॉबेरी येण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच त्याने उरलेल्या जागेत लसणाची लागवड केल्याने त्याला त्यातूनही उत्पन्न मिळत आहे.

हेही वाचा - प्रेम प्रकरणातून तरुणाने चाकूने भोकसून केली तरुणीची हत्या, स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न

चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण असून विदर्भाचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाते. यावेळी येथील वातावरण अल्हाददायक असल्याने पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यात स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळत असल्याने पर्यटक शेतकऱ्यांचेही मनभरून कौतुक करत आहेत. स्ट्रॉबेरी शेती ही नफ्याची मानली जाते. परंतु, अनेकदा या शेतीचे बदलत्या वातावरणामुळे नुकसान सुद्धा होते. यासाठी शासनाने अनुदान आणि विमा देणे गरजेचे आहे. जेणेकरून मेळघाटातील अनेक तरुण स्ट्रॉबेरी शेती करण्यासाठी पुढाकार घेतील असे या तरुण शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

हेही वाचा - मेळघाटातील कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार - यशोमती ठाकूर

Intro: मेळघाटातील चिखलदरा येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतुन तरुण घेतोय भरघोस उत्पादन.

पारंपरिक पिकांना फाटा देत नव्या शेतीकडे वाटचाल
----------–------------------------–-------------
स्पेशल पॅकेज स्टोरी करावी.

अमरावती अँकर
कुपोषण,बेरोजगारी, आरोग्याची समस्या,नापिकी या मुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या मेळघाट मध्ये आता प्रगतिशील शेतीची नांदी सुरू झाली आहे.पारंपरिक पिकाला रामराम ठोकून एका उच्चशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी शेती करायचा विचार केला आणि तो विचार कृतीत उतरवत यशस्वी शेतिकडे वाटचाल सुरू केली .गेल्या सात वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेतीतून चांगला नफा मिळवणाऱ्या एका उच्चशिक्षित आणि मेहनती तरुणाला आपण आज भेटणार आहोत.

Vo-1
अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले मोथा हे गाव या गावातील लोकांचे उत्पादनाचे साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय परन्तु दुधाला सध्या पाहिजे तेवढा भाव नाही.अनेक शेतकरी येथे पारंपरिक शेती करतात.उच्चशिक्षित असलेल्या रमेश पाटील हा तरुण पारंपरिक शेती करायचा .परंतू चिखलदरा मध्ये नेहमी पाऊस जास्त पडतो त्यामुळे त्यात नुकसान होत होते.दरम्यान रमेश पाटील या तरुणाने चिखलदराच्या थंड वातावरणाला पोषक असलेल्या स्ट्रॉबेरी शेतीची लागवड करायचा विचार केला.

बाईट-1-रमेश पाटील -उच्चशिक्षित शेतकरी.

Vo-2
राज्यात फक्त महाबळेश्वर या परिसरातील शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतात.मात्र आता मेळघाटातील शेतकरी सुद्धा विकसित सामाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आर्थिक उन्नती करण्यासाठी धडपडत असल्याचं दिसत आहे.नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मेळघाटातील आदिवासी बहुल शेतकऱ्यांना उपलब्ध वातावरणाचा लाभ होत आहे.दोन भाऊ करत असलेल्या या शेतीच्या कामाला त्यांना त्यांच्या आईचे ही सहकार्य लाभले.

बाईट-2-कमलाबाई पाटील-महिला शेतकरी.

Vo-3

पाटील यांच्या कडे दोन एकर शेती आहे.या तरुण
शेतकऱ्याने पहिले जमिनीचे सपाटीकरण करून,5 फूट अंतरावर समांतर गादी वाफे तयार केलीत,त्यावर महाबळेश्वर येथून आणलेली स्ट्रॉबेरीची रोपं समान अंतरावर लावली, ड्रीप द्वारे पाणी दिलं, मशागत केली आणि बघता बघता स्ट्रॉबेरीची बाग फुलली..विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता घरी असलेल्या गुरांचे शेणखत वापरले..स्ट्रॉबेरीचे पिक हे सहा महिन्यांचे असते. या वर्षी सुद्धा स्ट्रॉबेरी ची लागवड केली त्याला आता स्ट्रॉबेरी येण्यास सुरुवात झाली आहे..सोबत उरलेल्या जागेत या शेतकऱ्यांने लसणाची लागवड केल्याने त्याला त्यातूनहो उत्पन्न मिळते.

बाईट-3-रोशन पाटील शेतकरी-(आकाशी शर्ट)

आंबूस गोड चवीला असलेल्या या स्ट्रॉबेरी ने चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे
त्यामुळे चिखलदराला जाणारे अनेक पर्यटक या स्ट्रॉबेरी शेतात जाऊन कुतूहलाने शेतीची पाहणी करतात व स्ट्रॉबेरी खरेदी करतात.

बाईट-3-पर्यटक

Vo-4
स्ट्रॉबेरी शेती ही नफ्याची मानली जाते परन्तु अनेकदा या शेतीत बदलत्या वातावरणा मुळे नुकसान सुद्धा होते.यासाठी शासनाने अनुदान व विमा देणे गरजेचे आहे.जनेकरून मेळघाटातील अनेक तरुण स्ट्रॉबेरी शेती करण्यासाठी पुढाकार घेईल .

बाईट-4

Vo:-5
चिखलदरा हे विदर्भातील थंड ठिकाण असून विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. या वेळी येथील वातावरण आल्हाददायक असल्याने पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असून स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळत असल्याने शेतकऱ्यांचं कौतुक करत आहेत.फक्त आता गरज आहे ती शासनाने मेळघाटातील तरुणांना पाठबळ देण्याची.

स्वप्निल उमप
ETV भारत-अमरावती

Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jan 6, 2020, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.