अमरावती - मोर्शी तालुक्यातील तळेगाव परिसरात रात्री एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृतदेहाची अवस्था पाहता बलात्कार करून नंतर या महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झालेल्या महिलेची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर दगडाने वार केले असून महिलेच्या गुप्तांगावर देखील जखमा केलेल्या आहेत.
हत्या झालेली महिला ही वीटभट्टीवर काम करणाऱ्या निलेश मेश्राम या व्यक्तीसोबत अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. पोलिसांनी त्याची चौकशीसाठी केली असता त्याच्याकडून समाधानकारक माहिती पोलिसांना मिळाली नाही. सोमवारी ती घरातून शेण आणण्यासाठी गेली होती, असे त्याने पोलिसांना सांगितले.
ओळख पटवण्याचे होते आव्हान -
हत्या झालेल्या महिलेची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी दगडाने तिचा चेहरा विद्रूप केला होता. मात्र, पोलिसांनी रात्रभर तपास करत महिलेची ओळख पटवण्यात यश मिळवले.