अमरावती : परिस्थिती कशीही असली तरी खचून जायचं नाही.आज न उद्या यश येईलच कारण त्याच्या हाताला देवानं कला दिली आहे. त्या कलेचं सोन त्याला करायचं आहे. शिक्षनात तो फार रमला नाही. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यानं प्रात्यक्षिकांवर भर दिला. सहा महिने अफाट मेहनत घेतली. पैसे नव्हते तर दुसऱ्याच्यांकडे कामाला गेला साहित्य खरेदी केलं आणि आता त्याने राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती साकारली (Replica of Rashtrapati Bhavan ) आहे. अमर मेश्राम ( Amar Meshram Replica of Rashtrapati Bhavan ) अस या शेतकरी पुत्राच नावं आहे. तो अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली या एका छोटया गावात राहतो. त्याने दिल्ली मधील राष्ट्रपती भवनाची जशीच्या तशी प्रतिकृती अमरने त्याच्या अदभुत कलेतून साकारली आहे.
![राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_12012022083429_1201f_1641956669_926.jpg)
अमर मेश्राम याने यापूर्वी संसदेची प्रतिकृती (Replica of Parliament) तयार केली होती. तसेच आता राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार केली आहे. मोठ्या मेहनतीने त्याने ही प्रतीकृती तयार केली आहे. या कलाकृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील आपल्या या कार्याची दखल घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. तसेच आपल्याला काम करण्यासाठी मदत करावी. माझी दखल घेतल्यास मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया अमर यांने व्यक्त केली.
![संसदेची प्रतिकृती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_12012022083429_1201f_1641956669_459.jpg)
काही महिन्यांपूर्वी काही तरुणांनी महात्मा गांधी यांच्या चरख्याची हुबेहुब प्रतिकृती तयार केली होती. ही बातमी अमरने बघितली होती. त्या तरुणांच्या कामातूनच अमरने ही प्रेरणा घेतली आहे. त्यातूनच त्याने अगोदर संसद भवन आणि आता राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती विद्यार्थ्यांना पाहायला मिळावी, म्हणून तो आता लवकरच लोकांमध्ये ती प्रतिकृती आणणार आहे.