अमरावती - कृषिमंत्री अब्दुल सत्तार Agriculture Minister Abdul Sattar हे एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत मेळघाट दौऱ्यांवर आहेत. त्यांनी आज मेळघाटातील धारणी तालुक्यात येणाऱ्या साद्राबाडी गावातील शेतकऱ्यांची संवाद साधला. मात्र, सादराबाळी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लागतो या गावात अनिल ठाकरे Farmer Anil Thackeray committed suicide या सव्वीस वर्षीय आदिवासी शेतकऱ्याने वीष घेऊन आत्महत्या Farmer suicide in Melghat केल्याने मेळघाटात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - One killed by mob lynching in Assam : आसाममध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू.. 'असे' आहे कारण
नुकसान भरपाई मिळाली नसल्याने घेतला टोकाचा निर्णय - यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले नाही. शासनाकडून शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत मी आली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या अनिल ठाकरे या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात अतिवृष्टीने heavy rain affected farm पिकांसह घरांचे, पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत आज विधिमंडळ अधिवेशनात Maharashtra Monsoon Session 2022 चर्चा उपस्थित केली गेली. या चर्चेत दोन्ही बाजूने आमदारांनी सहभाग घेतला. आज या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm Eknath Shinde यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कृषी आराखडा cm Eknath Shinde government making Agriculture Plan तयार करण्याचे जाहीर केले आहे.
विमा दावे वेगाने निकाली काढणार अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र weather centers उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या weather centers वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील. तसेच पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करुन सूचना देण्यात येतात. तसेच कृषी कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे, अशा ठिकाणी नुकसानीची सूचना किवा अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज ग्राह्य धरले जातील. अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील व नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाणार आहे.
फडणवीस सत्ता काळात सर्वाधिक 14 हजार 961 शेतकऱ्यांच्या आत्महत्या नैसर्गिक आपत्ती, ओला दुष्काळ, नापिकीमुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफी तसेच नैसर्गिक आपत्ती भागात नुकसान भरपाई देण्याची योजना राबविल्या जातात. परंतु, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. फडणवीस सत्ता काळात सर्वाधिक 14 हजार 961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर महाविकास आघाडीच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात 5 हजार आठशे शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे.
सरसकट कर्जमाफीची योजना आखली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोनाशी मुकाबला करावा लागला. सर्वच घटकातील याचे परिणाम झाले. यामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीची योजना आखली. नैसर्गिक आपत्ती भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. मात्र शेतीच्या निकषात होरपळलेल्या शेतकऱ्याने शेतीच्या आधारावर मुलांचे उच्च शिक्षण, लग्नासाठी बँकांचे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता आलेली नाही. दुसरीकडे खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकी वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचे दिसून येतो.