ETV Bharat / state

Sant Gadge Maharaj Death Anniversary : मृत्यूच्या 65 वर्षानंतरही कर्मयोगी गाडगेबाबांच्या स्मृती जागृत

author img

By

Published : Dec 20, 2021, 2:50 AM IST

'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या कीर्तनाच्या माध्यमातून देव माणसात ओळखा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे जगण्याची दृष्टी समाजाला मिळावी यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या संत गाडगे महाराज यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव ते अमरावती मार्गावर असणाऱ्या पेढी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची आज 65 वी पुण्यतिथी आहे.

Sant Gadge Maharaj
कर्मयोगी संत गाडगे बाबा

अमरावती - भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार ,पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न आणि दुःखी व निराश यांना हिम्मत अशी दशसूत्री सांगून समाजाला वैचारिक दृष्टिकोन देऊन डोळसपणे जगण्याची शिकवण देणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची आज 65 वी पुण्यतिथी ( 65th Death Anniversary of Karmayogi Sant Gadge Maharaj ) आहे. गाडगेबाबांना जाऊन मोठा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या स्मृती मात्र आजही जागृत आहे.

मृत्यूच्या 65 वर्षानंतरही कर्मयोगी गाडगेबाबांच्या स्मृती जागृत

... म्हणून पुलाचे नाव पडले गाडगेबाबा सेतू -

'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या कीर्तनाच्या माध्यमातून देव माणसात ओळखा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे जगण्याची दृष्टी समाजाला मिळावी यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या संत गाडगे महाराज यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव ते अमरावती मार्गावर असणाऱ्या पेढी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. मुंबई-नाशिक पंढरपूर अशा सततच्या दौऱ्यावर असणाऱ्या गाडगेबाबांची प्रकृती 1956 च्या नोव्हेंबर महिन्यापासून खालावली होती. बरं वाटत नसल्यामुळे 7 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबा अमरावतीला परतले होते. अमरावतीत डॉक्टर शहा यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 13 डिसेंबर रोजी गाडगेबाबांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात ( Irwin Hospital Amravati ) दाखल करण्यात आले. बाबांना न्यूमोनिया डायबेटिक कामा नावाचा आजार जडला होता. बाबांना जरा बरे वाटायला लागल्यामुळे त्यांनी चांदूर बाजार तालुक्यात असणाऱ्या नागरवाडी येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. संत गाडगेबाबा 20 डिसेंबर 1956 च्या रात्री साडेआठच्या सुमारास चांदूरबाजार या गावात आले होते. चांदुर बाजार वरून नागरवाडीला जायचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे त्यांना अनेकांनी सकाळी नागरवाडी ला जाण्याचा आग्रह धरला. रात्री अकरा वाजता संत गाडगे बाबांनी नागरवाडी जाण्याचा हट्ट धरला असताना डॉक्टरांनी मात्र त्यांना त्वरित अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला. त्यावेळी गाडगे बाबांची गाडी अमरावतीच्या दिशेला वळविण्यात आली. गाडगेबाबांची गाडी अमरावती पर्यंत पोहोचली असताना वडगावच्या पेढी नदीवरील पुलावर गाडी असताना बाबांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या पेढी नदीच्या पुलावर गाडगेबाबांनी प्राण त्यागले तो पूल आज संत गाडगेबाबा सेतू म्हणून ओळखला जातो.

संत गाडगेबाबांचे समाधीस्थळ
संत गाडगेबाबांचे समाधीस्थळ

तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत गाडगेबाबांना अग्नी -

संत गाडगेबाबा गेलेत ही माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर कळली. इकडे गाडगे महाराजांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करावे याबाबत अनेकांचे भिन्न मते होती. मी आल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भुसावळ येथून अमरावतीला कळवले होते. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत तुकडोजी महाराज अमरावती पोहोचले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गाडगे महाराजांच्या पत्नी कुंताबाई या सुद्धा उपस्थित होत्या. ज्या ठिकाणी गाडगेबाबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याठिकाणी गाडगे महाराजांची समाधी उभारण्यात आली. आज याच ठिकाणी गाडगे महाराजांची सुंदरशी मूर्ती स्थापन करण्यात आली असून या परिसरालगत जी नागरी वसाहत वसली आहे तो संपूर्ण परिसर गाडगेनगर म्हणून ओळखला जातो.

धर्मपत्नी कुंताबाईंचे मंदिर
धर्मपत्नी कुंताबाईंचे मंदिर

तुकडोजी महाराजांनी वाहिली श्रद्धांजली

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गीत रचले होते.

सुनी खबर कि संत गाडगेबाबा हमको छोड गये
धडक भरी छाती मे हमको पलभर तो नही हो रहे
वाह वारे जनसेवक था तू ! नये युग का उजियारा
साधू को आदर्श बताने, दिया जन्म तुने सारा
भरा नजर मे तेज, बैराग कमण्डल मिट्टी का
फटे बास का दंड हात मे, फटा वस्त्र तेरा बाका
दया भाव असे भरा बदन सब, सारी दुनिया देख गये
धडक बरी छाती मे हमको, पलभर तो नही होश रहे

वाहनाद्वारे दिला जातो संत गाडगे बाबांचा संदेश -

संत गाडगे महाराजांनी अखेरचा श्वास हा (एमएच 27 बीएक्स 5341) या वाहनात घेतला होता. हे वाहन संत गाडगे महाराजांच्या समाधी परिसरात अनेक वर्षांपासून उभे होते. गत पाच-सात वर्षांपासून या वाहनाची दुरुस्ती करण्यात आली असून या वाहनाद्वारे आता संत गाडगेबाबांच्या विचारांची जनजागृती करणाऱ्या पुस्तकांसह विविध संदेश गावोगावी जाऊन ग्रामस्थांना उपदेश देण्यासाठी केला जातो आहे. संत गाडगे महाराजांनी पेढी नदीवरील वलगाव वरून अमरावती ला जोडणाऱ्या ज्या पुलावर अखेरचा श्वास घेतला होता, त्या पुलालगत आज संत गाडगे महाराज यांच्या नावाने वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात अनेक वृद्धांना जगण्याची नवी दिशा मिळाली असून या ठिकाणी गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रमाणे गरजवंतांना योग्य अशी मदत केली जाते.

वाहनाद्वारे दिला जातो संत गाडगे बाबांचा संदेश

दरवर्षी भरते यात्रा -

संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी गाडगे नगर परिसरात गाडगे महाराजांच्या समाधी मंदिरासमोर भल्या मोठ्या मैदानात यात्रा भरत असते. कोरोनामुळे गतवर्षीही यात्रा भरू शकली नाही. तसेच यावर्षी सुद्धा धोरणामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत अमरावतीसह लगतच्या परिसरातून हजारो नागरिक सहभागी होत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.