अमरावती - दर्यापूर तालुक्यातील चण्डिकापूर येथील एका शेतळ्यातील पाणी पिल्याने ६० शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बाकी शेळ्यावर उपचार सुरू आहे.
अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चण्डिकापूर या गावातील धुरंधर नामक शेतकऱ्याच्या शेतळ्यावर ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या ७० शेळ्या रोजच्या प्रमाणे आजही चराईला नेल्या होत्या. मात्र, शेतळ्यातील पाणी पिल्यानंतर सर्वच शेळ्यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यातील ६० शेळ्याचा जागीच मृत्यू झाला. बाकी शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या शेळ्याचे शवविच्छेदन सुरू असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.