अमरावती - अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, एका 60 वर्षीय व्यक्तीने 6 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने या मुलीला गाठी देण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. दरम्यान घरी आल्यावर मुलगी रडत असल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारना केली असता, तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात मंगरूळ दस्तगिर पोलीस ठाण्यात पोस्को, बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू मराठवाड्यात, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये उच्चांक