ETV Bharat / state

Navratri २०२३ : राज्यातील 'या' देवीच्या मंदिरात दररोज पाच हजार भाविक घेतात महाप्रसादाचा लाभ

Navratri २०२३ : यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या (Shardiya Navratri 2023) नऊ दिवशी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तर नवरात्रोत्सवात अमरावतीच्या ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबा आणि श्री एकवीरा देवी मंदिरात (Ekvira Devi) पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

Ekvira Devi Temple Amravati
श्री एकवीरा देवी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 4:00 PM IST

Updated : Oct 21, 2023, 4:08 PM IST

अमरावती : Navratri २०२३ : विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावतीच्या ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबा आणि श्री एकवीरा देवी मंदिरात (Ekvira Devi) नवरात्रोत्सव (Navratri 2023) थाटात साजरा होत आहे. यावर्षी पहिल्यांदाच श्री एकवीरा देवी संस्थांच्या वतीनं देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्याच्या विविध भागातील भक्तांसाठी खास महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर रोज पाच हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

अन्नछत्रात अनेक अमरावतीकरांची सेवा : श्री एकवीरा देवी संस्थांच्या वतीनं गतकाही वर्षांपासून श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीच्या (Amba And Ekvira Devi) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रोज नाममात्र शुल्कासह भोजनाची व्यवस्था केली जाते. तसेच नवरात्रोत्सव काळात दोन्ही देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या बाहेर गावच्या तसेच अमरावती शहरातील भाविकांना मोफत महाप्रसाद वितरित केला जातो. महाप्रसाद वितरण सेवेसाठी शहरातील अनेक मान्यवर तसेच युवक-युवती सहभागी होतात. नवरात्रोत्सव काळात रोज सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेक जण अन्नछत्रांमध्ये सेवा देत असतात. बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी देखील दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांसह भाविकांना आपल्या हातानं महाप्रसाद वितरित केला होता. तसेच त्यांनी श्री एकवीरा देवी संस्थांच्या वतीनं वितरित होणाऱया महाप्रसादाचा आस्वाद घेतला. तर दररोज 5 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती श्री एकविरा देवी संस्थानचे विश्वस्थ शैलेश वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

सर्वांना सोबत घेऊन नियोजन : अमरावती शहरात अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी श्री एकवीरा देवी संस्थानने पुढाकार घेतला आहे. तर या उपक्रमात अमरावती शहरातील विविध घटकांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वांना सोबत घेऊनच महाप्रसादाचं नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री एकवीरा देवी संस्थानचे सचिव चंद्रशेखर कुळकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शहरातील विविध मंडळ, अनेक संस्थांचे पदाधिकारी, विश्वस्त हे स्वतः सेवा देण्यासाठी समोर आले आहेत. संस्थेने जे काही नियम आखून दिले आहे, त्याप्रमाणे सर्वच सेवाधारी आपली सेवा देतात. त्यामुळे या ठिकाणी 5 हजार काय आणि त्यापेक्षा अधिकही भाविक प्रसाद घेण्यासाठी आले तरी, कुठलीही अडचण होत नाही. प्रत्येकाला अतिशय शांततेने प्रसाद ग्रहण करता येतो.

महाप्रसादासाठी तीन दालन : श्री एकवीरा देवी संस्थानच्या वतीनं भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यासाठी चार मजली इमारतीमध्ये एकूण तीन दालन तयार करण्यात आले आहेत. एकाचवेळी किमान 500 भाविक अन्नग्रहण करू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या अन्नछत्रातील वातावरण अतिशय स्वच्छ आणि धार्मिक असते. दोन भाज्या, पोळी, भात आणि एक गोड पदार्थ असा महाप्रसाद वितरित केला जातो.

श्री अंबा आणि श्री एकवीरा देवी मंदिरात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

हेही वाचा -

Navratri २०२३ : नवरात्रीच्या उपवासाचे खास नियम; जाणून घ्या कोणत्या गोष्टींची घ्यावी विशेष काळजी

Navratri 2023 Day 7 : देवी कालरात्रीच्या पूजेनं मिळते आसुरी प्रभावापासून मुक्ती; जाणून घ्या उपासनेची पद्धत आणि रंग

Navratri 2023 Day 4 : शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते कुष्मांडा देवीची पूजा; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग

Last Updated : Oct 21, 2023, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.