अमरावती - शहरात डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आढळून आले आहेत. तसेच गेल्या ३० दिवसात ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. तसेच वातावरणात देखील सारखे बदल होत आहे. यामुळे हळू-हळू डेंग्यूचा आजार पसरायला सुरुवात झाली आहे. गेल्या ३० दिवसात शासकीय आणि खासगी रुग्णालयात २८४ रुग्ण संशयित आढळले. त्यापैकी ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या ५ महिन्यात डेंग्यूच्या तपासणीमध्ये ४६७ केली असता यामध्ये १०७ रुग्णा आढळले. यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ६४ संशयित रुग्णांची नोंद झाली, तर त्यापैकी १० पॉझिटिव्ह रुग्णांवर मेडीसिन वार्डात उपचार करण्यात आले.
हे वाचलं का? - नाशिकमध्ये डेंग्यूचा विळखा; ऑक्टोबर महिन्यात १७८ जणांना डेंग्यूची लागण
वैद्यकीय अधिकारी महापालिकेला वारंवार सूचना देत आहेत. डेंग्यूचे डास नष्ट करण्यासाठी महापालिकेतून धुराची फवारणी करण्यात येत आहे. तसेच शहरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, अद्यापही महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे.