ETV Bharat / state

अमरावतीत गुरुवारी 31 नवीन कोरोनाबाधितांची नोंद; एकूण बाधितांची संख्या 679 वर - civil hospital amravati

अमरावती शहर कोरोनाने व्यापले असताना आणि जिल्ह्यात सर्व चौदाही तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गुरुवारी अशोक नगर परिसरात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील टोपे नगर, सिद्धार्थ नगर, ग्रेटर कैलास नगर, तपोवन, परांजपे कॉलनी, चवरेनगर, अंबिकनगर, वृंदावन कॉलनी, चवरेनगर, अंबागेट, राजेंद्र कॉलनी आणि अंबापेठ परिसर येथे कोरोनाबाधित आढळले आहेत.

civil hospital amravati
जिल्हा रुग्णालय, अमरावती
author img

By

Published : Jul 10, 2020, 6:54 AM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी 31 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 679 वर पोहोचली आहे.

गुरुवारी आढळलेले कोरोनाबाधित -

  • वालगाव येथील विलगीकरण कक्षात 65 आणि 23 वर्षीय पुरुष आणि 24 आणि 36 वर्षीय महिला
  • जिल्हा सामान्य रुग्णालयातील 36 वर्षीय पारिचरिका (या पारिचारिकेने कोविड रुग्णालयात सेवा दिली आहे)
  • बेलपुरा परिसरात 36 वर्षीय पुरुष

यासोबतच अशोक नगर परिसरात तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील टोपे नगर, सिद्धार्थ नगर, ग्रेटर कैलास नगर, तपोवन, परांजपे कॉलनी, चवरेनगर, अंबिकनगर, वृंदावन कॉलनी, चवरेनगर, अंबागेट, राजेंद्र कॉलनी आणि अंबापेठ परिसर येथे तर चांदुर रेल्वे शहरात 3 आणि चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या लालखेड येथे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यात सर्व 14 तालुक्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.