ETV Bharat / state

Amravati Graduate constituency election : ठरलं तर! एवढे उमेदवार लढणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार असून मजमोजणी 2 फेब्रुवारीला होईल.

Graduate constituency election
पदवीधर मतदार संघ निवडणूक
author img

By

Published : Jan 16, 2023, 10:14 PM IST

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या 33 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी 10 उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता उर्वरित 23 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

दहा उमेदवारांचे अर्ज मागे : गोपाल सुखदेवराव वानखेडे, मधुकर दिगांबर काठोळे, प्रा. डॉ. प्रफुल्ल अजाबराव राऊत, राजेश मोतीराम दांदडे, ॲड. सिध्दार्थ मारोतराव गायकवाड, राजेश सोपान गावंडे, किरण अर्जुन चौधरी, पांडुरंग तुकारामजी ठाकरे, नामदेव मोतीराम मेटांगे, मीनल सचिन ठाकरे अशी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

23 उमेदवार निवडणूक लढविणार : धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प्रजापती, डॉ. प्रविण रामभाऊ चौधरी, प्रविण डिगांबर बोंद्रे, भारती ख. दाभाडे, माधुरी अरुणराव डाहारे, संदेश गौतमराव रणवीर, लक्ष्मीकांत नारायण तडसे, विकेश गोकुलराव गवाले, सुहास विठ्ठलराव ठाकरे, संदीप बाबुलाल मेश्राम अशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.

2 फेब्रुवारीला मजमोजणी : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला होणार असून 2 फेब्रुवारीला मजमोजणी होईल. मतमोजणी ही नेमाणी गोडावून येथे होणार असून सुमारे 1 हजार 152 मनुष्यबळ मतदान प्रक्रियेत सहभागी असेल. अमरावती विभागात एकूण 262 मतदान केंद्रावर मतदान होईल. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. निरंतर मतदार नोंदणी प्रक्रियेनंतर अंतिम मतदार संख्या 2 लाख 6 हजार 172 झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 64 हजार 344, अकोला जिल्ह्यात 50 हजार 606, बुलडाणा 37 हजार 894, वाशिम जिल्ह्यात 18 हजार50 तर यवतमाळ जिल्ह्यात 35 हजार 278 मतदार नोंदणी झाली आहे.

काय असतो पदवीधर मतदार संघ : महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो.

हेही वाचा : Amravati to Ajmer by cycle : ख्वाजाच्या दर्शनासाठी बारा दिवसांची सायकलवारी, 22 वर्षांपासून अनोखा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.