अमरावती - नागपूरवरून बुलढाणा जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात 2 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले. ही घटना महामार्गावरील नांदगांव पेठ नजीक हॉटेल वाटिका Travels Accident Amravati जवळ मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. ट्रॅव्हल्समधील अन्य १४ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती नांदगांव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे. राहुल विनय गुप्ता वय ५० रा सार्भा नगर, लुधियाना पंजाब आणि अरुण प्रल्हाद सावळे वय ५५, रा नंदनवन नागपूर हे दोघेही जागीच ठार झाले. तर सीमा शुद्धोधन पाटील वय ३५ रा. सक्करदरा, नागपूर व अमित सुरेश बेरोजाय वय ३४ रा लकडगंज, भुसावळ चौक, खामगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल : अपघात घडताच काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अन्य १४ प्रवास्यांनी आपापली व्यवस्था करून सुखरूप निघून गेले. सरदार सुरेंद्र सिंग कुलावंत सिंग रा कर्नाल हरियाणा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या चालकावर कलम २७९,३३७,३३८,३०४अ, भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा - Satara Accident डंपर दुचाकीच्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरूणी जागीच ठार