अमरावती - साईनगर परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक भरधाव कार घराच्या कुंपणावर आदळली. गाडी स्पीड ब्रेकरवरून उसळल्याने हा अपघात झाला. या गाडीतील २० ते २१ वयोगटातील दोन युवक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - 'तुझी दररोज आठवण येते', श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवी भावुक
सकाळी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या मार्गावरून गर्दी असताना हा विचित्र अपघातात झाला. साईनगर ते अकोली मार्गावर असणाऱ्या एकविरा विद्युत कॉलनीमधील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या गल्लीतून (एम एच 27, 8366) या क्रमांकाची कार सकाळी साडेसात वाजता भरधाव वेगात आली. ही कार स्पीड ब्रेकरवर आदळून थेट हवेतच रस्ता ओलांडून पलीकडे असणाऱ्या डॉ. वैभव माहुरे यांच्या घराच्या कुंपणावर आदळली. वर्दळीच्या या रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघाताबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.