ETV Bharat / state

Amravati Rangoli : कराटे खेळत पावणेतीन तासात साकारली पंधरा हजार स्क्वेअर फूट रांगोळी - अमरावती रांगोळी माधुरी सदा

सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार माधुरी सुदा यांनी अमरावतीच्या पन्नालाल नगर येथे "संस्कृती संग सुरक्षा" या थीमखाली कराटे खेळत पावणे तीन तासात तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फूटवर तिने भव्य दिव्य रांगोळी काढली आहे.

Amravati Rangoli
अमरावती रांगोळी
author img

By

Published : Jan 8, 2022, 12:43 PM IST

Updated : Jan 8, 2022, 3:43 PM IST

अमरावती - अनेक जण आगळ्यावेगळ्या रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असतात. ( Social massege through rangoli ) कुणी चित्रदेखील रांगोळीच्या माध्यमातून काढत असतात. चांगली रांगोळी काढणे ही एक उत्तम कला आहे. या रांगोळीच्या माध्यमातून विविध रेखाटनही केले जाते.

प्रतिक्रिया

रांगोळी काढून विक्रम -

अनेक जणांनी भव्यदिव्य रांगोळ्या काढून नावलौकिक केले आहे. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार माधुरी सुदा यांनी अमरावतीच्या पन्नालाल नगर येथे "संस्कृती संग सुरक्षा" या थीमखाली कराटे खेळत पावणे तीन तासात तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फूटवर तिने भव्य दिव्य रांगोळी काढली आहे. (Rangoli made in three and a half hours by playing karate ) रांगोळी कलाकार माधुरी सुदाने आतापर्यंत पाच वर्ल्ड रांगोळ्या तिच्या नावावर आहे. त्यानंतर आजदेखील रांगोळी काढून तिनं नवा विक्रम केला आहे. या रांगोळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

हेही वाचा - World record performance : दृष्टीहीन सायकलपटूची जनजागृतीसह विश्वविक्रमी कामगिरी

महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी ही रांगोळीत आहे. महिलांनी आत्मसुरक्षेसाठी कराटेसारखे खेळ शिकणे आवश्यक आहे. रांगोळीच्या माध्यमातून 'संस्कृती संग सुरक्षा' हा संदेश माधुरी सुदा व त्यांच्या 26 सदस्यांच्या टीमने दिला आहे. आतापर्यंत पाच रेकॉर्ड नावाने केलेल्या माधुरी सुदा यांच्या 26 सदस्यांच्या टीमने कराटे खेळत ही रांगोळी साकार केली आहे. ही रांगोळी काढायला पाच तास लागतील, असे त्यांना वाटत होते. मात्र, 2 तास 42 मिनिटात त्यांनी ही रांगोळी काढली आहे.

Last Updated : Jan 8, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.