ETV Bharat / state

मोहल्ला स्कूल संकल्पनेतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन; खंडाळा जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम - akola latest news

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात येणारे अडथळे दूर करणे शक्य नसल्यामुळे, सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील खंडाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मोहल्ला शाळा या पर्यायाचा उपयोग सुरू केला आहे. त्यांना या प्रयोगात बर्‍यापैकी यशही मिळत आहे.

मोहल्ला स्कूल संकल्पनेतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन; खंडाळा जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

author img

By

Published : Jul 26, 2020, 11:36 AM IST

Updated : Jul 30, 2020, 6:31 PM IST

अकोला - कोविड-19 या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शाळा बंद असल्या तरी त्या विविध माध्यमाद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न शासन व शिक्षण संस्था करीत आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात येणारे अडथळे दूर करणे शक्य नसल्यामुळे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील खंडाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मोहल्ला शाळा या पर्यायाचा उपयोग सुरू केला आहे. त्यांना या प्रयोगात बर्‍यापैकी यशही मिळत आहे.

गावातील एका मोहल्ल्यातील पाच ते दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व इतर आरोग्यविषयक निर्देश लक्षात घेऊन एकत्रित करीत मोहल्ला शाळा उपक्रम सुरू केला आहे. आठवड्यातील दोन दिवस शाळेतील गोपाल मोहे, निखील गिर्हे व तुलसीदास शिरोडकार हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासोबतच मुख्याध्यापक शीला टेंभरे यांच्या मार्गदर्शनात अध्यापक ओमप्रकाश निमकडे, श्रीकृष्ण वाकोडे, राजेंद्र दिवनाले, सुरेखा हागे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिनकर धूळ, संदीप काटे, युवराज खंडेराव यांनी गावातील दर्शनी भागातील रस्त्यांच्या भिंतीवर विविध विषयांचे पाठ्य घटक लेखन करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

मोहल्ला स्कूल संकल्पनेतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन; खंडाळा जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

मोहल्ला शाळा या उपक्रमातून प्रत्यक्ष शिक्षक सहवास व शैक्षणिक समस्यांचे निराकरण होत असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यात व सहभाग घेण्यात आनंद वाटत आहे. मोहल्ला शाळेला तेल्हारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे, विस्तार अधिकारी गोपाल भुजबळ, केंद्रप्रमुख गजानन गायकवाड यांनी भेट देऊन विद्यार्थी शिक्षक व पालकांशी संवाद साधत उपक्रमाचे कौतुक केले आहे. या उपक्रमाची यशस्विता पाहून तालुक्यात इतरत्र असा उपक्रम राबविता येईल का याबाबत विचार करू, असे मत गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Jul 30, 2020, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.