ETV Bharat / state

इंधन दरवाढीवरून अकोल्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारचा नोंदवला निषेध - युवक काँंग्रेसचे अकोल्यात आंदोलन

मंगळवारी अकोला युवक काँग्रेसतर्फे शहरातील विविध पेट्रोल पंपांवर जाऊन आंदोलन करत पंतप्रधान मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी 'मै न बोलूंगा, न देखूंगा, न सुनूंगा' असे निषेध फलक दर्शवत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली.

youth-congress-protest-
अकोल्यात युवक काँग्रेसचे आंदोलन;
author img

By

Published : Mar 3, 2021, 7:49 AM IST

अकोला - पेट्रोल-डिझेलच्या दर शंभरीजवळ पोहोचल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. याविरोधात मंगळवारी अकोला युवक काँग्रेसतर्फे शहरातील विविध पेट्रोल पंपांवर जाऊन आंदोलन करत पंतप्रधान मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी 'मै न बोलूंगा, न देखूंगा, न सुनूंगा' असे निषेध फलक दर्शवत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. शहर अध्यक्ष अंनशुमन देशमुख व ॲड.महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अकोल्यात युवक काँग्रेसचे आंदोलन
अकोल्यात युवक काँग्रेसचे आंदोलन

सरकारने इतर देशांकडून धडा घ्यावा-

कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत घसरत असताना देखील भारतात सलग ८२ दिवस पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलीही घसरण झाली नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांना याचा लाभ होऊ शकला नाही. यादरम्यान अमेरिका, चीन, ब्राझील सारख्या देशांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली होती. या देशांकडून केंद्र सरकारने धडा घ्यायला हवा होता. तसेच आता आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या किंमतींचे कारण देत सतत इंधन दरवाढ सुरू आहे आणि हा आकडा आता शंभर रुपयांवर येऊन पोहोचला आहे. इंधनाचे दर नियंत्रित करण्यात तसेच सामान्यांना दिलासा देण्यात हे केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याची टीका यावेळी काँग्रेसने केली आहे.

अकोल्यात युवक काँग्रेसचे आंदोलन;
अकोल्यात अग्रसेन चौक येथील पेट्रोलपंपावर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्या नेतृत्वात व, प्रदेश महासचिव सागर कावरे, राजेश मते पाटील, सचिव ॲड. विवेक गावंडे, सोशल मीडिया संयोजक भुषण टाले, निलेश मते पाटील, सय्यद आरिफ, फैझल खान, गणेश टाले, अक्षय इनामदार, ह्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.