अकोला - किराणा दुकानात काम करणाऱ्या दोन नोकरांनी त्याच दुकानात हाथ साफ करत एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अकोल्यात घडली. जुने शहर पोलिसांनी दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोन्ही नोकरांना अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्या नोकरांकडून तब्बल 1 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा... डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला
योगेश राठी व उमाकांत यादव असे या दोन्ही चोरट्या नोकरांचे नाव आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळील मार्केटमध्ये आनंद चंद्रकांत वनवणी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात योगेश राठी व उमाकांत यादव हे दोघे काम करतात. या दोघांनी मिळून किराणा दुकानातील थोडा थोडा माल काढून तो चोरला होता. असा हा एकत्रित माल तब्बल 1 लाख 80 हजार रुपयांचा होता.
हेही वाचा... विकृतीचा कळस..! गाईच्या वासरावर अनैसर्गिक अत्याचार
दुकान मालक वनवणी यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांनी तपासादरम्यान योगेश राठी व उमाकांत यादव यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 96 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.