अकोला- अकोला महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागामध्ये आजपासून मद्य विक्रीला सुरुवात झाली आहे. मूर्तिजापूर शहरामध्ये असलेल्या मद्यविक्री ठिकाणांवर विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले. याठिकाणी ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टन्ससिंग तसेच मद्यसाठा देताना सॅनिटायझरचा उपयोग विक्रेते करीत आहेत.
हेही वाचा- COVID-19 India tracker: जाणून घ्या कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी
कोरोना रुग्णांची संख्या अकोला शहरात कमालीची वाढली आहे. त्यामुळे प्रशासन येथे काळजी घेत आहे. अकोला महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागात मद्यविक्री करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार मुर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी तालुक्यात मद्य विक्रीला प्रारंभ झाला आहे. मुर्तिजापूर शहरात मद्य विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली असून पोलिसांचाही याठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे.