अकोला - जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाच्या प्रक्रियेला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. 15 लाख 77 हजार 476 मतदार 1703 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
हेही वाचा - मतदान कार्ड नसले तरी चिंता नको...'या' 11 ओळखपत्रांचा करू शकता वापर
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, अकोला पूर्वचे भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर हे त्यांच्या मूळ गावात पळसो बढे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान करणार आहेत. या मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांची गर्दी होती. सकाळपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस असला तरी मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी दिसत आहे.